कपिल शर्मा ज्याला आपण ‘कॉमेडी किंग’ असे म्हणतो, ते टीव्ही जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. शोमध्ये तो जे काही करतो त्यात कॉमेडी दडलेली असते, त्याच्यासाठी तो प्रसिद्ध आहे. तो स्वत:च्या आयुष्यात एक स्टार देखील आहे आणि गेल्या अनेक वर्षांपासून ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल या शोमध्ये जवळपास सर्वांचाच स्टार झाला आहे. चाहते हा उत्कृष्ट शो पाहण्यासाठी नेहमीच वेडे असतात आणि प्रत्येक वीकेंडला नवीन भाग येण्याची आतुरतेने वाट पाहत असतात.
कदाचित तुम्हाला माहीत झालं असेल. जर तुम्हाला माहित नसेल तर तुमच्या माहितीसाठी आम्ही एक गोष्ट तुम्हाला सांगतो की कॉमेडी नाईट्स विथ कपिल शो 22 जून 2013 रोजी कलर टीव्हीवर सुरू झाला होता. तिथं प्रत्येक आठवड्याला एक नवी व्यक्ती पाहूणा म्हणून येते. तिथं येणाऱ्या अनेक व्यक्तींना कपीलने त्यांच्या स्टाईलने बोलतं केल्याचं पाहायला मिळत. कपील सोबत आणखी कलाकार त्या शोमध्ये दिसतात. ते सुध्दा अफलातून कॉमेडी करत असल्याचे पाहायला मिळते.
हा शो मधल्या काही काळासाठी बंद झाला होता. पण नंतर ‘द कपिल शर्मा शो’ पुन्हा नव्या पद्धतीने सुरू करण्यात झाला. त्याच्या वाढदिवसाच्या 21 दिवसांनी सुरू झाला. त्याचा वाढदिवस 2 एप्रिल रोजी आहे. म्हणजे आज आहे. तसेच हा शो पुन्हा सोनी टीव्हीवर 23 एप्रिल 2016 रोजी शो सुरू झाला. पहिल्या शोनंतर कपिल शर्माने मागे वळून पाहिले नाही.