मोटोरोलाने भारतात आपले नवीन प्रोडक्ट दोन आठवड्यांपूर्वी लाँच केले, ज्याचे नाव मोटोरोला मोटो टॅब जी70 (Motorola Moto Tab G70) असे आहे. हा एक टॅबलेट (Tablet) आहे आणि रियलमी पॅड आणि सॅमसंग टॅब्लेटशी स्पर्धा करेल. Moto Tab G70 च्या प्रमुख फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 2K डिस्प्ले, क्वाड स्पीकर आणि अनेक चांगले स्पेक्स मिळतील. या टॅबची सुरुवातीची किंमत 21,999 रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. यात मीडियाटेक हेलिओ प्रोसेसर आणि क्वाड स्पीकर्स आहेत, जे डॉल्बी अॅटमॉससह येतात. Moto Tab G70 बद्दल बोलायचे तर, हा एक हाय-एंड टॅबलेट आहे, जो गेमिंग आणि इतर गोष्टींसाठी देखील वापरला जाऊ शकतो. युजर्स व्हिडिओ आणि गेमिंगसाठी देखील याचा वापर करू शकतात.
Motorola च्या या लेटेस्ट टॅबलेटबद्दल बोलायचे झाले तर, यात 11 इंचाचा डिस्प्ले आहे, जो 2K (2 हजार रिझोल्यूशन) सह येतो. यात पातळ बेझल्स आहेत, जे टॅब्लेटला आकर्षक लुक देतात. तसेच, त्यात एज टू एज व्ह्यूचा अँगल देण्यात आला आहे. हा टॅबलेट एचडी सर्टिफिकेशनसह येतो, जो Amazon आणि Netflix सारख्या स्ट्रीमिंग अॕप्सना सपोर्ट करतो.
मोटोरोलाच्या या टॅबलेटमध्ये 7700 mAh ची बॅटरी दिली आहे, जी टॅबलेटला मजबूत बॅटरी बॅकअप देण्यास मदत करेल. याशिवाय, यामध्ये MediaTek Helio G90T ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये युजर्सना 4 जीबी रॅम मिळेल. तसेच यामध्ये 64 GB इंटरनल स्टोरेज मिळेल. आवश्यक असल्यास युजर्स यामध्ये 1 टीबी पर्यंत एसडी कार्ड जोडू शकतात.
Motorola Moto Tab G70 च्या कॅमेरा डिपार्टमेंटबद्दल बोलायचे झाले तर, याच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे, तर 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे, जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी वापरला जातो. यात क्वाड स्पीकर सिस्टम आहे, जी डॉल्बी अॕटमॉसला सपोर्ट करते.
Moto G70 फ्लिपकार्टवर आजपासून (3 फेब्रुवारी) खरेदीसाठी उपलब्ध आहे आणि त्याची किंमत 21,990 रुपये आहे. हा टॅब सिंगल कलर आणि स्टोरेज व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. जर तुम्ही हा टॅब खरेदी करताना ICICI बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पेमेंट केलं तर तुम्हाला यावर चांगल्या ऑफर्सचा लाभ घेता येईल. आजपासून या फोनचा सेल सुरु झाला आहे.