देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि दीर्घकाळ आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी आज 65 वर्षांचे झाले आहेत. जगातील अव्वल अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट असलेली अंबानींची कंपनी RIL कडे, सध्या 17 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅप आहे आणि त्यानुसार जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत RIL 42 व्या स्थानावर आहे.
वडील धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी यांनी रिलायन्सची कमान आपल्या हातात घेतली आणि ती एवढ्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवली.
जगातील टॉप-10 अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी 10व्या स्थानावर आहेत. सध्या त्यांची एकूण संपत्ती 100.6 अब्ज डॉलर आहे. मुकेश अंबानी यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूपच रंजक होता.
जिथून त्यांचे वडील दिवंगत धीरूभाई अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज सोडली होती, तेथून मुकेश अंबानी यांनी कंपनीला अशा वळणावर नेले की, देशाच्या आणि जगातील मोठ्या कंपन्या त्यांच्या खूप मागे होत्या.
विशेष म्हणजे, केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्यासमवेत 1981 मध्ये रिलायन्स पेट्रोलियम केमिकल्स सुरू केले. त्यानंतर, 1985 मध्ये, कंपनीचे नाव रिलायन्स टेक्सटाईल इंडस्ट्रीज लिमिटेड बदललं आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड करण्यात आले. पेट्रोलियम व्यतिरिक्त मुकेश अंबानी यांनी दूरसंचार क्षेत्रातही पुढे पाऊल टाकले आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स लिमिटेडची स्थापना केली.
6 जुलै 2002 रोजी धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजची सूत्रे हाती घेतली. मात्र, वडिलांचे निधन होताच त्यांचा आणि धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्यात मालमत्तेवरून वाद सुरू झाला आणि हा वाद वेगळं होण्यापर्यंत पोहोचला.
विभाजन अंतर्गत, रिलायन्स इन्फोकॉम धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्याकडे गेला, तर रिलायन्स इंडस्ट्रीज लि. मुकेश अंबानी यांच्याकडे गेला.
मुकेश अंबानी यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने रिलायन्स इंडस्ट्रीजला देशातील सर्वात मोठी कंपनी बनवले. 2002 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप 75 हजार कोटी रुपये होते, जे आता मुकेश अंबानी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली 17 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे.
दुसरीकडे, त्यांचा धाकटा भाऊ अनिल अंबानी यांच्या वाटेला आलेली रिलायन्स कॅपिटल ते आता विकण्याच्या मार्गावर आहेत.
मुकेश अंबानी यांच्या हुशार आणि चाणाक्षपणामुळे, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने केवळ 58 दिवसांत Jio Platforms चे एक चतुर्थांश भाग विकून 1.15 लाख कोटी रुपये आणि 52,124.20 कोटी रुपये राइट्स इश्यूद्वारे उभे केले. यामुळे कंपनी नियोजित वेळेच्या ९ महिने आधीच पूर्णपणे कर्जमुक्त झाली.
31 मार्च 2020 अखेर रिलायन्सवर 1,61,035 कोटी रुपयांचे कर्ज होते आणि कंपनीने 31 मार्च 2021 पर्यंत त्याची परतफेड करण्याचे लक्ष्य ठेवले होते. या कामगिरीवर मुकेश अंबानी म्हणाले की, कंपनीच्या भागधारकांना दिलेले वचन मी पूर्ण केले आहे.
उद्योजक गौतम अदानी यांच्या विषयी जाणून घ्या इथे :