आपल्या देशातील लाखो लोक उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त आहेत. रक्तदाब नियंत्रित न राहिल्यास हृदयविकाराच्या झटक्यासह हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या अनेक आजारांचे ते कारण बनते. डब्ल्यूएचओच्या मते, भारतात रक्तदाबाचे 220 दशलक्षाहून अधिक रुग्ण आहेत, त्यापैकी केवळ 12 टक्के लोक रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकतात. अनियंत्रित रक्तदाबामुळे व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. आजच्या धावपळीच्या युगात लोकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यायलाही वेळ मिळत नाही. मात्र, हा निष्काळजीपणा रक्तदाबाच्या रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकतो. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, रोज सकाळी उठल्यानंतर एक ग्लास ज्युस प्यायल्याने तुमचा रक्तदाब कमी वेळात नियंत्रित होईल. जाणून घ्या याविषयी काही खास गोष्टी.
बीटचा रस –
बीटचा रस हा उच्च रक्तदाबावर रामबाण उपाय मानला जातो. बीटच्या रसामध्ये कॅलरीज कमी असतात आणि त्यात जीवनसत्त्वे, खनिजांसह अनेक पोषक घटक असतात. हेल्थलाइनच्या अहवालानुसार, 2016 मध्ये झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, कच्च्या बीटचा रस पिल्याने रक्तदाब लक्षणीयरीत्या नियंत्रित होतो.
टोमॅटोचा रस –
आत्तापर्यंतच्या अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की, रोज एक ग्लास टोमॅटोचा रस पिल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. टोमॅटोचा रस सिस्टोलिक आणि डायस्टोलिक रक्तदाब सुधारतो. गरोदरपणात टोमॅटोचा रस देखील फायदेशीर आहे. याशिवाय खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यातही हा रस प्रभावी आहे.
डाळिंबाचा रस –
डाळिंबामध्ये फोलेट आणि व्हिटॅमिन सी सारख्या पोषक तत्वांसोबतच शक्तिशाली दाहक-विरोधी (एंटी-इंफ्लेमेटरी) गुणधर्म देखील असतात. डाळिंबाचा रस प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते आणि चेहराही उजळतो. 2017 च्या एका अभ्यासानुसार, डाळिंबाचा रस उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यात अनेक पोषक घटक असतात.
जांभळाचा रस
जांभूळ आणि ब्लूबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. 2016 मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात असे आढळून आले की, जांभूळ किंवा जांभळाचा रस प्यायल्याने सिस्टोलिक रक्तदाब आणि LDL कोलेस्ट्रॉल दोन्ही कमी होते. जांभळाच्या रसाचे सेवन करूनही मधुमेह नियंत्रित ठेवता येतो. ते आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. Sdnewsonline त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)