बाळाला दोन डोकी असल्याचा समजातून आईचे रुग्णालयातून पलायन

झारखंडच्या रिम्स (RIMS) रुग्णालयामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका निर्दयी मातेने आपल्या नुकत्याच जन्मलेल्या बालकाला रुग्णालयातच सोडून पळ काढला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, संबंधित बालक हे जन्माजात ओसीपीटल मेनिन्गोकोकल एन्सेफॅलोसिल (Occipital Meningoencephalocele) आजाराने ग्रस्त होते. या आजारामध्ये डोक्याच्या मागचा भाग हा बाहेर आलेला असतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीला दोन डोके असल्याचा भास होतो.

दरम्यान हे बालक ओसीपीटल मेनिन्गोकोकल एन्सेफॅलोसिल पीडित असल्याने, त्याला दोन दोन डोके असल्याचा समज त्याच्या घरच्यांचा झाला. त्यांनी त्याच अवस्थेमध्ये बालकाला रुग्णालयात सोडून पळ काढला. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाच्या वतीने पोलिसात तक्रार देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, तपासाला सुरुवात केली. मात्र संबंधित कुटुंबाने दिलेला घरचा पत्ता देखील चुकीचा असल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यामुळे या बालकाला दत्तक घेण्याचा निर्णय या रुग्णालयातील डॉक्टरांनी घेतला असून, डॉक्टरांच्या वतीने चालवण्यात येणारी एनजीओ या मुलाचा सांभाळ करणार आहे.

या बालकावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याच्या डोक्याचा अतिरिक्त भाग काढून टाकण्यात आला आहे. शस्त्रक्रियेनंतर या बालकाची प्रकृती स्थिर असून, पुढील दहा दिवस त्याला बालरोग तज्ज्ञांच्या निगरानीत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला एनजीओमध्ये दाखल करण्यात येईल. अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या मुलाला चमचाच्या मदतीने सध्या दूध भरवण्यात येत आहे.

ओसीपीटल मेनिन्गोकोकल एन्सेफॅलोसिल हा एक असा आजार आहे की, या आजारामध्ये संबंधित व्यक्तीच्या डोक्याच्या मागच्या बाजूला अतिरिक्त भाग वर येतो. त्याचा आजार हा एखाद्या पिशवी सारखा असतो. त्यामुळे संबंधित व्यक्तीला किंवा बालकाला दोन डोके असल्याचा भास होतो. मात्र हा काही असाध्य अजार नसून, शस्त्रक्रियेनंतर असा मनुष्य नॉर्मल जीवन जगू शकतो. तसेच या आजारापासून इतरही काही धोके उद्धभवत नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.