टीम इंडियांच्या स्वप्नांवर पावसाचं पाणी! मुंबईतील हवामानामुळे दुसरी टेस्ट संकटात

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरी आणि शेवटची टेस्ट शुक्रवारपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत आहे. ही टेस्ट जिंकून आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये नंबर 1 होण्याची संधी टिम इंडियाला आहे. पण, मुंबईतील हवामानामुळे भारतीय टीमची अडचण वाढली आहे. बुधवारपासून मुंबईत जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे दोन्ही टीमना प्रॅक्टीस देखील करता आली नाही. या पावसामध्ये वानखेडे स्टेडियमचं पिच आणि विशेषत: आऊट फिल्ड चांगलं ठेवण्याचं आव्हान निर्माण झालं आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ नं दिलेल्या वृत्तानुसार हवामान विभागानं मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. याचा अर्थ मुंबईत पाऊस कायम राहणार आहे. सतत होणाऱ्या पावसाचा मुंबई टेस्टच्या पहिल्या दिवसाला फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईमध्ये यावर्षी नोव्हेंबर महिन्यात जवळपास 30 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, हा एक रेकॉर्ड आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरबी समुद्रातील मालदीव, लक्षद्विप या भागात चक्रीवादळाचा पट्टा निर्माण झाल्यानं हा पाऊस पडत आहे. येत्या आठवड्यातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  मुंबईत गुरुवारी दिवसभर पावसाची शक्यता असून संध्याकाळी  काही भागात जोरदार पाऊस पडू शकतो. शुक्रवारी पावसाची शक्यता कमी आहे. पण, गुरुवारी उशीरापर्यंत पाऊस झाला तर मॅच उशीरा सुरू होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.