प्रोस्टेट ही पुरुषांमध्ये आढळणारी एक ग्रंथी आहे. प्रोस्टेट संसर्ग असल्यास लघवी करताना जळजळ किंवा वेदना होण्याची समस्या उद्भवू शकते. काही लोक प्रोस्टेट संसर्गास प्रोस्टेट कर्करोग मानतात, परंतु हे चुकीचे आहे. मात्र, प्रत्येकवेळी प्रोस्टेटचा संसर्ग म्हणजे प्रोस्टेट कर्करोग नसतो. पण, तुम्हाला प्रोस्टेट कॅन्सरची लक्षणे जाणवत असतील तर नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधा. प्रोस्टेट ग्रंथीची वाढ जास्त झाल्यास ऑपरेश करावे लागते. प्रोस्टेट कमी प्रमाणात असताना औषधांनी तो बरा करता येतो. येथे आपण प्रोस्टेट संसर्गाची लक्षणे जाणून घेऊयात. ज्यामुळे ऑपरेशन करण्याचा धोका टळू शकतो.
प्रोस्टेट संसर्गाची लक्षणे –
1- तुम्हाला प्रोस्टेट इन्फेक्शन असल्यास, लघवी करताना जळजळ किंवा वेदना जाणवते.
2. प्रोस्टेट संसर्ग असल्यास अनेकदा उलट्या किंवा मळमळ होण्याची समस्या देखील होऊ शकते.
3. प्रोस्टेट इन्फेक्शनची समस्या असल्यास शरीर वेदना होण्याचा त्रास असू शकतो.
4. प्रोस्टेट संसर्ग झाल्यास ताप किंवा थंडी वाजून येणे यासारखी लक्षणेदेखील दिसू शकतात.
5. पाठ किंवा पोटदुखीची समस्या हे देखील प्रोस्टेट संसर्गाचे लक्षण आहे.
प्रोस्टेट संसर्ग का होतो?
बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे प्रोस्टेट संसर्गाची लक्षणे दिसतात.
एसटीडी आजारामुळेही प्रोस्टेटचा संसर्ग होऊ शकतो.
जर तुम्ही शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय प्रक्रियेमुळे मूत्र विसर्जन करण्यासाठी कॅथेटर घातले असेल, तरीही तुम्हाला प्रोस्टेट संसर्ग होऊ शकतो.
प्रोस्टेट संसर्गावरील उपचार –
1- जर तुम्हाला प्रोस्टेट इन्फेक्शन असेल तर तुम्ही हळदीच्या दुधाचे सेवन करावे. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात ज्यामुळे संक्रमण लवकर बरे होण्यास मदत होते.
2- प्रोस्टेट इन्फेक्शनच्या समस्येवर मात करण्यासाठी तुम्ही केगल व्यायाम करू शकता. यामुळे तुमचे मूत्राशय निरोगी राहतील.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. Sdnewsonline त्याची हमी देत नाही.)