आर. डी. बर्मन यांच्या काही मनोरंजक गोष्टी
१. आर.डी.बर्मन यांनी ‘मेहमूद’ यांच्या ‘भूत बंगला’तून ऑनस्क्रीन पदार्पण केले.
२. ‘तिसरी मंजिल’ चित्रपटातील ‘ओ मेरा सोना रे’ गाण्यासाठी पहिल्यांदाच भारतीय चित्रपटांमध्ये बर्मन यांच्याद्वारे इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर करण्यात आला.
३. खूप कमी जणांना माहित असेल की, ‘सोलवा साल’ चित्रपटातील हेमंत कुमार यांनी गायलेल्या ‘है अपना दिल तो आवारा’ या गाण्यातील माउथ ऑरगन हे स्वतः आर.डी.बर्मन यांनी वाजवले होते.
४. ‘चुरा लिया’ या गाण्यात बर्मन यांनी ग्लासवर चमचा मारून निर्माण होणा-या ध्वनीचा वापर केला होता.
५. गाण्यात पावसाच्या थेंबाचा आवाजाचे संगीत देण्यासाठी बर्मन पावसाळ्या रात्री घरातील बालकनीत बसून पडणा-या पावसाचा थेंबाचा आवाज रेकॉर्ड करत असत.
६. आर.डी.बर्मन यांनी मित्र लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या ‘दोस्ती’ चित्रपटासाठी आणि कल्याणजी-आनंदजी यांच्या चित्रपटांसाठी माउथ ऑरगन वाजवले होते.
७. एस. डी. बर्मन यांनी आर.डी.बर्मननी तयार केलेली ‘ए मेरी टोपी पलट के आ’ ही धून ‘फंटूश’ चित्रपटात वापरली होती. हे गाणे जेव्हा तयार करण्यात आले त्यावेळी बर्मन हे अवघे नऊ वर्षांचे होते.
८. ‘परिचय’ या चित्रपटातील त्यांचे ‘बीती ना बिताये रैना’ हे गाणे एका हॉटेल रूममध्ये ध्वनीबद्ध करण्यात आले होते. या गाण्यासाठी लता मंगेशकर आणि भूपिंदर यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
९. हिंदी चित्रपटसृष्टीत ब्राझिलचे बोस्सा नोव्हा रिदमचा वापर करणारे बर्मन हे पहिले संगीतकार होते. ‘पती पत्नी’ चित्रपटात आशा भोसले यांनी गायलेल्या ‘मार डालेगा दर्द-ए-दिल’ गाण्यासाठी या रिदमचा वापर करण्यात आला होता.
१०. ‘अब्दुल्ला’ गाण्यासाठी बर्मन यांनी बांबूला फुगा बांधून त्यातून निर्माण होणा-या ध्वनीचा संगीतासाठी वापर केला होता.
सं|जी|व वे|ल|ण|क|र, पुणे