पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जूनला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 महिन्यात दुसऱ्यांदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधान 14 जूनला राज्यात येणार असल्याच्या माहिती भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी ट्विट करुन दिली. पंतप्रधान देहूत मंदिराच्या लोकार्पणासाठी येणार आहेत.
पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण होणार आहे. पंतप्रधान मोदी याआधी 6 मार्चला पुण्यात मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आले होते.

आचार्य तुषार भोसले यांनी काही दिवसांपूर्वीच 29 मार्चला पंतप्रधानांची भेट घेतली होती. या भेटीत तुषार भोसले यांनी मोदी यांना आमंत्रण दिलं होतं. यावेळेस त्यांच्यासोबत देहू संस्थानाच्या विश्वस्तही उपस्थित होते.भोसले यांनी दिलेलं आमंत्रण पंतप्रधानांनी स्वीकारलंय. त्यानुसार आता पंतप्रधान 14 जूनला देहूत येणार आहेत.

“महाराष्ट्र आणि वारकरी संप्रदायासाठी ऐतिहासिक क्षण. इतिहासात पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहु येथे येणार आहेत. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी जी दि. १४ जून रोजी करणार जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण! ॥ जय जय रामकृष्णहरि ॥ “, असं ट्विट आचार्य तुषार भोसले यांनी केलंय.

दरम्यान 20 जूनपासून वारी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. कोरोना विषाणूमुळे गेल्या 2 वर्षांपासून वारी सोहळा होऊ शकला नव्हता. मात्र आता सर्व निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात वारी सोहळा होईल, याबाबत शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.