मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग जगभरात वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने एक ताजी आकडेवारी सादर केली असून ती भयावह आहे. डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार, गेल्या 20 दिवसांत या विषाणूचा संसर्ग 27 देशांमध्ये पसरला आहे.
मंकीपॉक्सचा आतापर्यंत 780 जणांना संसर्ग झाला आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे या विषाणूने आता लोकांचाही बळी घ्यायला सुरुवात केली आहे. काँगोमध्ये या वर्षी मंकीपॉक्समुळे नऊ जणांचा मृत्यू झाला, तर नायजेरियामध्ये पहिला मृत्यू झाला आहे.
मार्गदर्शक तत्त्वात असेही म्हटले आहे की, संसर्गाच्या काळात रुग्ण किंवा त्यांच्या दूषित सामग्रीशी शेवटचा संपर्क झाल्यानंतर 21 दिवसांच्या कालावधीसाठी दररोज स्वत:च्या आरोग्याचे निरीक्षण केले पाहिजे.
आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर एखाद्याला मंकीपॉक्सची लक्षणे दिसली, तर लॅबमध्ये चाचणी केल्यानंतरच मांकीपॉक्सची खात्री केली जाईल. मंकीपॉक्ससाठी केवळ पीसीआर किंवा डीएनए चाचणी वैध असेल, असेही मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे.
WHO च्या मते, एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला मंकीपॉक्सचा संसर्ग होण्याची फारच कमी प्रकरणे आहेत. बाधित व्यक्तीच्या शिंका-खोकल्यातून बाहेर पडणारे थेंब, बाधित व्यक्तीच्या त्वचेवर फोड येणे किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संसर्ग इतर लोकांमध्ये पसरण्याची शक्यता असते.