प्रदीप भिडे यांचं निधन; दूरदर्शनवरील बातम्यांचा बुलंद आवाज हरपला
दूरदर्शनचा चेहरा अशी ओळख असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचं प्रदीर्घ आजाराने मुंबईत निधन झालं. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून म्हणजेच आत्ताच्या ‘सह्याद्री’ वाहिनीवरून गेली चाळीसहून अधिक वर्षे ‘नमस्कार, आजच्या ठळक बातम्या’ असे सांगणारा भारदस्त आवाज हरपलाय. १९७४ ते अगदी २०१६ पर्यंत त्यांनी दूरदर्शनसाठी वृत्तनिवेदक म्हणून काम केलं. ते ६४ वर्षांचे होते.
ऑल इंडिया रेडिओ पुणे तसेच सह्याद्री बातम्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन भिडे यांच्या निधनासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काही वर्षे नोकरी करून त्या काळात ती सोडण्याचे धाडस दाखवलेले, नाटककार रत्नाकर मतकरी यांच्या नाटय़संस्थेतून काही काळ नाटकांशी जोडले गेलेले आणि हजारो जाहिराती, माहितीपट-लघुपट यांचा ‘आवाज’ असलेले ज्येष्ठ वृत्तनिवेदक-सूत्रसंचालक प्रदीप भिडे हे दूरदर्शनमुळे महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले.
सर्व रुग्णांचा कॅन्सर काही दिवसांतच पूर्णपणे ‘गायब’; फक्त एका औषधानेच केला चमत्कार
कॅन्सर म्हटलं की तरी फक्त नाव ऐकूनच धडकी भरते. कॅन्सर रुग्णांना बऱ्याच उपचारांना सामोरं जावं लागतं. तरी कॅन्सर पूर्णपणे बरा होत नाही किंवा तो पुन्हा पुन्हा डोकं वर काढतो. पण आता कॅन्सर उपचारात शास्त्रज्ञांना ऐतिहासिक यश मिळालं आहे. शास्त्रज्ञांनी कॅन्सरविरोधात असं औषध तयार झालं आहे, ज्यामुळे कॅन्सर काही दिवसातच गायब होतो. या औषधाची रुग्णांवरील चाचणी 100 टक्के यशस्वी ठरली आहे. याचा रिझल्ट पाहून डॉक्टरही हैराण झाले आहेत.
अगदी छोट्या स्तरावर कॅन्सर रुग्णांवर डोस्टारलिमॅब औषधाचं ट्रायल घेण्यात आलं. 12 रुग्णांना हे औषध देण्यात आलं. एका मर्यादित कालावधीपर्यंत हे औषध दिल्यानंतर या रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या शरीरात कॅन्सर नसल्याचं निदान झालं. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीनमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे. ग्लॅक्सोस्मिथक्लाइन कंपनीने तयार केले हे औषध आहे. रेक्टल कॅन्सरच्या रुग्णांवर या औषधाची यशस्वी चाचणी झाली आहे. ज्याचे परिणाम हैराण करणारे आहेत.
केजरीवालांचे मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणीत वाढ! मित्राच्या घरातून कोट्यवधी रुपये, सोनं जप्त
दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. माहितीनुसार, अंमलबजावणी संचालनालयाने जैन यांच्या जवळच्या मित्राच्या घरातून 2.82 कोटी रुपये रोख आणि मोठ्या प्रमाणात सोने जप्त केले आहे. छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड, सोन्याची बिस्किटे आणि 133 सोन्याची नाणीही सापडल्याचे सांगण्यात येत आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सत्येंद्र जैनच्या अनेक ठिकाणी अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीचे पथक छापे टाकत आहेत. त्याच वेळी, दिल्ली सरकारचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्यासह हवाला ऑपरेटरच्या ठिकाणांवर ईडी छापे टाकत आहे. या एपिसोडमध्ये आदल्या दिवशी जैन यांच्या जवळच्या मित्राच्या घरातून सुमारे तीन कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती.
केतकीला पुन्हा झटका, आजही जामीन नाही
गेल्या काही दिवासांपासून सोशल मीडियावर केतकी चितळे हे नाव चांगलच चर्चेत आलं आहे. शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट करणं तिला चांगलं महागात पडलं आहे. याप्रकरणी दिवसेंदिवस तिच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. तसेच आता नुकतंच समोर आलेल्या माहितीनुसार, ॲट्राॅसिटी प्रकरणात केतकी चितळेच्या जामीन अर्जावर सुनावणी 16 जूनला सुनावणी होणार आहे.
वर्ष 2020 मध्ये अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल झाला होता. केतकीने सोशल मीडियावर अनुसूचित जातींच्या व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केली होती.
लालू प्रसाद यादव यांच्या बेडरुमला लागली आग, सगळीकडे एकच गोंधळ
झारखंडमध्ये तीन दिवसांच्या मुक्कामावर आलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या बेडरुमला आग लागल्याचं वृत्त आहे. पलामू येथील सर्किट हाऊसमध्ये त्यांच्या खोलीत भिंतीला लावलेल्या पंख्यामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागली. त्यामुळे उपस्थित लोकांमध्ये घबराट पसरली होती. दरम्यान आरजेडी सुप्रीमो सुरक्षित आहेत.
लालूंच्या खोलीत आग लागली तेव्हा लालू डायनिंग हॉलमध्ये वर्तमानपत्र वाचत होते, असे सांगण्यात आले. आगीची माहिती मिळताच सर्किट हाऊसमधील कर्मचाऱ्यांनी तात्काळ कार्यभार स्वीकारला. तेथील वीज कनेक्शन तोडून परिस्थिती हाताळण्यात आली.
RBI ची बैठक संपण्याआधीच ‘या’ तीन बँकानी व्याजदर वाढवले; EMI आणखी वाढणार
स्वस्त कर्जाचे दिवस आता गेले असंच म्हणावं लागेल. कारण सर्वच बँकांना आपल्या कर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दरात वाढ केल्यानंतर जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर वाढवले आहेत. आता पुन्हा एकदा RBI रेपो दरात वाढ करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र रिझर्व्ह बँकेच्या घोषणेआधीच बँकांनी व्याजदर आणखी वाढवण्यास सुरुवात केली आहे. आजपासून तीन बँकांनी आपल्या व्याजदरात वाढ केली आहे.
आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, कॅनरा बँक , एचडीएफसी बँक आणि करूर वैश्य बँकेने त्यांचे व्याजदर वाढवले आहेत.
रिया चक्रवती विशेष एनडीपीएस कोर्टासमोर गैरहजर
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत ड्रग प्रकरणात आरोपी असलेली रिया चक्रवर्ती आज विशेष एनडीपीएस कोर्टासमोर हजर झाली नाही. आता यप्राकरणी पुढील सुनावणी 22 जून रोजी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिने वकिलांमार्फत कोर्टात उपस्थित न राहण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज केला होता. त्याप्रमाणे ती आज कोर्टात हजर राहिली नाही. आता याप्रकरणाची पुढील सुनावणी 22 जूनला होणार आहे. ती आता जरी हजर राहिली नसली तरी पुढच्यावेळी आरोपींवरील आरोप निश्चित होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणातील सर्व आरोपींना पुढीलवेळी कोर्टात हजर राहावे लागेल.
बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ ८ जून रोजी दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्यातील बारावीचा निकाल निकाल जाहीर करेल. दरवर्षी १० लाखांहून अधिक विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाची बारावीची परीक्षा देतात. गेल्या वर्षी १२ लाख विद्यार्थ्यांपैकी ९९.६३टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. महाराष्ट्र बोर्डाची ही आतापर्यंतची सर्वाधिक उत्तीर्ण टक्केवारी आहे.
अकोल्यातील सहा पोलीस निलंबित
शहरातील किराणा बाजारपेठेमधून ४० लाखांचा गुटखा अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या पथकाने जप्त केला. या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जुने शहर पोलीस ठाण्यातील सहा पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
राज्यसभा निवडणूक: माकपचे आमदार विनोद निकोले शिवसेनेला करणार मतदान
राज्यसभा निवडणुकीवरून महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अपक्ष आणि इतर छोट्या पक्षाचे आमदार आपल्या बाजूने वळवण्यासाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. अशात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणूचे आमदार विनोद निकोले हे शिवसेनेच्या गळाला लागले आहेत.
मेट्रो ३ च्या कारशेडवरून शिवसेना भाजपाच्या कात्रीत
मेट्रो-३’साठी कारशेड प्रस्तावित असलेल्या कांजूर येथील जमिनीसह तेथील अन्य जागाही आपल्या मालकीची असल्याचा पुनरुच्चार केंद्र सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात केल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे कुटुंबामुळे मेट्रो ३ चे काम रखडल्याचा आरोप करत शिवसेनेची राजकीय कोंडी करण्याची संधी भाजपला मिळाली आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्पाचा कारशेड मार्गी लावण्याचे आव्हान आणि त्यावरून भाजपचे राजकीय डावपेच या कात्रीत शिवसेना सापडली आहे.
SD Social Media
9850 60 3590