राज्यात कोरोनाचा विळखा, 24 तासात 26 हजार 538 रुग्ण आढळले

राज्यात ओमिक्रॉन आणि कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज कोरोना रुग्णांचा आकडा 26 हजारांच्या पार गेला आहे. गेल्या 24 तासात तब्बल 26 हजार 538 रुग्ण कोरोना आढळून आले आहेत, तर राज्यात आज ओमिक्रॉनचे तब्बल 144 रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात आज 8 करोना बाधित रुग्णाांच्या मत्युंंची नोंद झाली आहे. कोरोनाची ही स्फोटक वाढ धडकी भरवणारी आहे. राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे.

दिवसभरात राज्यात ओमिक्रॉनचे तब्बल 144 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनचे टेंन्शन वाढले आहे. यातील सर्वाधिक रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबईत 100 रुग्णांची नोंद झाल्याने मुंबई पुन्हा अलर्ट मोडवर आली आहे. दिवसभरात नागपूरमध्ये 11 तर ठाणे आणि पुणे मनपा प्रत्येकी 7 ओमिक्रॉन रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 797 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 330 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मुंबईत आज तब्बल 15 हजार 166 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तिन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला 20 हजाराच्या पुढे गेली तर लॉकडाऊन लावण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबईची वाटचाल आता लॉकडाऊनच्या दिशेनं सुरु आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. मुंबईत आज 15 हजार 166 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 13 हजार 195 रुग्णांना कोणतीही लक्षणं नाहीत. तर आज 1 हजार 218 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज दिवसभरात 714 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 3 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.