Budget 2023 : मोदी सरकारची मोठी घोषणा, कररचनेत केले बदल
आता कमी होईल, पुढच्या वर्षी कर कमी होईल असं म्हणत दरवर्षी अर्थसंकल्पाकडे चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य नोकरदार वर्गांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी 7 लाखापर्यंत उत्पन्न हे करमुक्त असणार आहे. 3 लाखांपर्यंत कर माफ असणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून कर स्लॕबमध्ये बदल व्हावा अशी मागणी होती. अखेरीस आज अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आली आहे. 3 लाखांपर्यंत कर माफ असणार आहे.आयकरची मर्यादा ही सरसकट 7 लाखापर्यंत करण्यात आली आहे. तर 3 ते 6 लाख उत्पन्नावर 5 टक्के कर असणार आहे. 6 ते 9 लाख उत्पन्नावर 10 टक्के कर आकारला जाईल. 9. ते 12 लाख उत्पन्न असेल तर 15 टक्के कर आकारला जाईल. 15 लाखांवर ज्यांचे उत्पन्न आहे, त्यांना 30 टक्के कर असणार आहे.
दरम्यान, निर्मला सीतारमन यांनी अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात केली आणि वेगवेगळ्या योजना आणि तरतुदींबद्दल घोषणा करत होत्या. अर्थसंकल्प 7 मुद्यांवर आधारीत आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह सर्वच भाजप खासदारांनी बाक वाजवून स्वागत केलं. यावेळी, भाजप खासदारांनी मोदी मोदी अशा घोषणा देऊन सभागृह दणाणून सोडलं.
मोदींची पहिली प्रतिक्रिया “मध्यमवर्गाला सक्षम बनवणारा अर्थसंकल्प”
मोदी सरकारचा दुसऱ्या कार्यकाळातला आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वीचा आजचा अर्थसंकल्प हा खऱ्या अर्थाने शेवटचा अर्थसंकल्प होता. तेव्हा अर्थसंकल्पात किती मोठ्या घोषणा केल्या जातात, काय विशेष तरतुदी केल्या जातात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अर्थसंकल्प सादर झाल्यावर एकीकडे शेयर बाजारात आलेली तेजी, बदललेल्या प्राप्तिकर कर रचनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया असं वातावारण असतांना पंतप्रधान मोदी यांनी अर्थसंकल्पातील तरतुदींचे जोरदार समर्थन केलं आहे.“समृद्ध आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद ही देशाच्या मध्यमवर्गात आहे. युवा वर्ग ही जशी भारताची ताकद आहे तसा मध्यमवर्ग ही जमेची बाजू आहे. या वर्गाला सक्षम बनवण्यासाठी आम्ही अनेक निर्णय हे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून घेतले आहेत. प्राप्तिकर रचना अधिक पारदर्शक केल्यामुळे आता मध्यमवर्गाला आणखी दिलासा मिळणार आहे ” अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पावर दिली आहे.
सेंद्रिय शेतीचं नुसतं तुणतुणं वाजवलं, राजू शेट्टींनी चुकांवर ठेवलं बोट
या देशातील केवळ 4% लोकांनाच हमीभाव मिळतो. शेतीसाठी सरकार करतंय काय? भरड धान्य शेतकऱ्याला परवडत का? सरकारने फक्त सेंद्रिय शेतीचे तुणतुणं वाजवले, असं म्हणत स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अर्थसंकल्पावर टीका केली.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. शेतकऱ्यांसाठी सरकारने भरीव अशा घोषणा केल्यात. पण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि अजित नवले यांनी नाराजी व्यक्त केली.
धक्कादायक! 11 गरोदर माता घेऊन जाणाऱ्या ऍम्ब्युलन्सचा भीषण अपघात
गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जाणाऱ्या ऍम्ब्युलन्सचा शहादामध्ये भीषण अपघात झाला आहे. लोणखेडा कॉलेज गेटसमोर ही ऍम्ब्युलन्स पलटी झाली आहे. अपघातावेळी 11 गरोदर माता ऍम्ब्युलन्समध्ये होत्या. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
अपघातामध्ये जखमी झालेल्यांना शहादामधल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे. अतिदुर्गम भाग असलेल्या तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातले हे रुग्ण होते.
हसन मुश्रीफांवर पुन्हा ईडीची नजर, जिल्हा बँकेसह अनेक ठिकाणी छापे
कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ पुन्हा एकदा इडीच्या रडारवर आले आहेत. मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ईडीने आज (दि.01) छापे टाकले. बँकेच्या मूख्य कार्यालयासह सेनापती कापशी शाखेवर हे छापे पडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या बँकेवर छापे पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. तसेच सेनापती कापसी येथील जिल्हा बँकेच्या शाखेचीही तपासणी सुरु आहे.मागच्या काही दिवसांपूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापशी येथील साखर कारखाना व मुलीच्या घरी ईडीने छापे टाकले होते. यानंतर पुन्हा एकदा ईडीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेत छापा मारत कारवाई केली आहे.
कर्नाटक निवडणुकीत पुन्हा त्रिशंकू परिस्थिती? काँग्रेस आणि भाजपाची कुमारस्वामींवर नजर
कर्नाटकमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे. याआधीच्या इतिहासाप्रमाणे यंदादेखील कर्नाटकमध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण होऊ शकते असं राजकीय जाणकारांना वाटत आहे. दरम्यान भारतीय जनता पार्टी आणि कांग्रेस या दोन्ही पक्षांचं जनता दल (सेक्युलर) या पक्षावर लक्ष आहे. राज्यातल्या अनेक विधानसभा मतदार संघांमध्ये जेडीएस हा पक्ष मजबूत स्थितीत आहे. त्यामुळेच दोन्ही पक्ष बहुमतासह सरकार स्थापन करण्यासाठी जेडीएसला मतदान होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहेत.
SD Social Media
9850 60 3590