स्पायडर-मॅन : नो वे होम गाठतोय यशाची नवनवीन शिखरं

स्पायडर-मॅन : नो वे होम यशाची नवनवीन शिखरं गाठतोय. जगभरात या सिनेमाची चर्चा सुरू आहे. कोरोना महामारी नंतरचा हा पहिलाच सिनेमा आहे, जो धुमाकूळ घालतोय.

मार्वलचा नवा सुपरहिरो सिनेमा ‘स्पायडर मॅन : नो वे होम’ जागतिक स्तरावर महामारीच्या काळानंतर बॉक्स ऑफिस रेकॉर्ड मोडतोय. डेडलाइनच्या रिपोर्टनुसार, चित्रपटाने. जगभरात $302.9 दशलक्ष कमावलेत. हा आकडा अर्धा अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे.

जॉन वॉट्स दिग्दर्शित या चित्रपटानं शुक्रवारी USमध्ये बॉक्स ऑफिसवर $121.5 दशलक्ष कमाई केली. यासह दुसऱ्या सर्वात जास्त ओपनिंग करणाऱ्या दिवसाची नोंद झाली. तर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी या ३ दिवसांत परदेशात $181.4 दशलक्ष कमावत $ 300 दशलक्षचा टप्पा ओलांडला. शनिवारपर्यंत हा आकडा ओलांडणारा स्पायडरमॅन नो वे होम हा सहावा तर महामारीच्या काळात असा विक्रम करणारा पहिला चित्रपट आहे.


ड्वेन जॉन्सननं टॉम आणि संपूर्ण नो वे होमच्या टीमचं अभिनंदन केलंय. मी खूप आनंदी आहे. तुमचं आणि संपूर्ण टीमचं अभिनंदन. या प्रचंड आणि ऐतिहासिक विजयाचा आनंद घेऊ या, असं त्यानं म्हटलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.