करिश्मा कपूर ही 90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. करिश्माने तिच्या काळात बॉलिवूडमधील आघाडीच्या कलाकारांसोबत काम केले होते.2006 मध्ये करिश्माने बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न केले. लग्नानंतर काही दिवसांतच दोघांमध्ये मतभेद सुरू झाले.
करिश्माने संजय आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. करिश्माचं हे प्रकरण बरंच चर्चेत राहिलं. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार करिश्माने तिच्या याचिकेमध्ये बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला होता.करिश्माने तिच्या याचिकेत म्हटले होते की, संजय तिला खूप त्रास देत असे. करिश्मा जेव्हा गरोदर होती तेव्हा संजय तिच्यासाठी एक ड्रेस घेऊन आला. करिश्माला तो ड्रेस परिधान करण्यास संजयने सांगितलं.पण करिश्माला हा ड्रेस शोभून दिसत नसल्याने संजयने तिला विचित्र वागणूक दिली. करिश्माच्या कानाखाली मार असं संजयने त्याच्या आईला सांगितलं.
गरोदरपणातच करिश्माला अशा अनेक गोष्टींचा सामना करावा लागला. अखेरीस 2016 मध्ये दोघांनी अधिकृतरित्या घटस्फोट घेतला.घटस्फोटानंतर संजयने प्रिया सचदेवशी पुन्हा लग्न केले तर करिश्मा अजूनही अविवाहित आहे. करिश्माला संजय कपूरपासून दोन मुले आहेत.करिश्माच्या मुलीचे नाव समायरा कपूर आणि मुलाचे नाव कियान कपूर आहे. करिश्माची दोन्ही मुलं तिच्यासोबतच राहतात.