1 मार्च 2023 म्हणजेच आजपासून अनेक नियम बदलणार आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 1 मार्चपासून अनेक नवीन नियम लागू होतील आणि यामुळे तुमच्या मासिक बजेटवर परिणाम होऊ शकतो. मार्च महिन्यात सोशल मीडिया, बँक कर्ज, एलपीजी सिलिंडर, बँकांच्या सुट्ट्या इत्यादींसह अनेक महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील. त्याच वेळी, ट्रेनच्या वेळापत्रकात देखील बदल पाहिले जाऊ शकतात. याची तयारी तुम्ही करायला हवी. या महिन्यात असे 5 मोठे बदल होणार आहेत, ज्यावर बहुतेक लोकांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. या बदलांचा तुमच्या खिशावरही परिणाम होईल. काहीवेळा तुम्हाला नवीन नियमांचा फायदा होतो तर कधी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतात. चला तर मग जाणून घेऊया मार्चमध्ये कोणते नवीन नियम लागू होणार आहेत आणि त्यांचा तुमच्या मासिक खर्चावर काय आणि कसा परिणाम होऊ शकतो.
एलपीजी आणि सीएनजीच्या किमतीत होऊ शकते वाढ : एलपीजी, सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमती प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला निश्चित केल्या जातात. गेल्या वेळी एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ झाली नसली तरी यंदा सणासुदीमुळे दर वाढण्याची शक्यता आहे.
मार्चमध्ये 12 दिवस बँका बंद राहतील : मार्चमध्ये होळी आणि नवरात्रीसह 12 दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये बँकांच्या साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्च 2023 च्या कॅलेंडरनुसार, खाजगी आणि सरकारी बँका 12 दिवस बंद राहतील.बँक कर्ज महागू शकते : रिझर्व्ह बँकेने नुकतीच रेपो दरात वाढ केली आहे. यानंतर अनेक बँकांनी MCLR दर वाढवला आहे. याचा थेट परिणाम कर्ज आणि ईएमआयवर होईल. कर्जाचे व्याजदर वाढू शकतात.
सोशल मीडियाशी संबंधित नियमांमध्ये होऊ शकतात बदल: नुकतेच भारत सरकारने आयटी नियमांमध्ये बदल केले आहेत. ट्विटर, फेसबुक, यूट्यूब आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आता भारताच्या नवीन नियमांचे पालन करावे लागणार आहे. धार्मिक भावना भडकावणाऱ्या पोस्टवर नवा नियम लागू होणार आहे. हा नवा नियम मार्चमध्ये लागू होऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने पोस्ट केल्याबद्दल यूझर्सला दंड देखील भरावा लागू शकतो.
ट्रेनच्या वेळापत्रकात बदल : यावेळी भारतीय रेल्वे ट्रेनच्या वेळापत्रकात काही बदल करू शकते. त्याची यादी मार्चमध्ये जाहीर होऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 मार्चपासून हजारो पॅसेंजर ट्रेन आणि 5,000 मालगाड्यांचे वेळापत्रक बदलले जाऊ शकते.