भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. आजपासून या कसोटी मालिकेतील तिसरा सामना इंदोर येथे खेळवला जाणार असून आज या सामन्याचा पहिला दिवस आहे. पुन्हा एकदा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्यासाठी मैदानात उतरणार असून या मालिकेत भारत विजय आघाडी मिळवेल का? याकडे सर्वांचे लक्ष असेल.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या मालिकेत आतापर्यंत भारताने दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. भारताने या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली असून यात फलंदाजापेक्षा गोलंदाजांचे योगदान अधिक आहे. नागपूर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 1 डाव आणि 132 धावांनी पराभूत केले होते. तर दुसऱ्या सामन्यातही दिल्ली येथे झालेल्या सामन्यात भारताने 6 विकेट्सने सामना जिंकला होता.
ऑस्ट्रेलिया संघ या कसोटी मालिकेत भारतापुढे गटांगळ्या खात आहे. अशातच ऑस्ट्रेलिया संघाला दुखापतीच ग्रहण लागलं असून अर्ध्याहून अधिक खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. तसेच या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स हा कौटुंबिक कारणामुळे मायदेशात परतल्यामुळे स्टीव्ह स्मिथकडे कर्णधारपद देण्यात आले आहे.
कधी होणार सामना :
1 मार्च ते 5 मार्च दरम्यान इंदोरच्या होळकर स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील तिसरा सामना पारपडणार आहे. हा सामना सकाळी 9:30 वाजता सुरु होणार असून त्यापूर्वी अर्धातास अगदोर नाणेफेक होईल.
कुठे होईल सामना :
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील तिसरा सामना स्टार स्पोर्ट्सच्या सर्व चॅनेल्सवर दाखवण्यात येणार आहे. तसेच हॉट्सस्टार अँपवर देखील हा सामन्याचे थेट प्रक्षेपण प्रेक्षकांना पाहता येईल.
भारतीय संघ :
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, श्रीकर भारत, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शुभमन गिल, ईशान किशन, कुलदीप यादव, उदय उनाडकत, सूर्यकुमार यादव , उमेश यादव