माहूर तालुक्यात कोविड केअर सेंटरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून देण्याची प्राचार्य केशवे यांचे मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
माहूर हा नांदेड या जिल्ह्याच्या ठिकाणापासून १३० की.मी. तर शेजारच्या विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याच्या १०० की.मी. तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यापासून १२० की. मी. अंतरावर असल्याने व माहूर तालुक्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात अढळत असून माहूर या तालुक्याच्या ठिकाणावरच्या कोविड केअर सेंटरमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजन सुविधा उपलब्ध नसल्याने इथून रेफर केलेल्या रुग्णास वेळेत सुविधा न मिळाल्याने वाटेतच प्रवासात प्राण गमवावे लागतात एवढी भीषण स्थिती तालुक्याची आहे. तसेच हा तालुका अतिदुर्गम भाग असल्याने व येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती व शेतमजुरी असल्याने तालुक्यातील बहुतांश गावे पंचायत राज पेसा क्षेत्रात असून हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची संख्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे. दोन वेळच्या जेवणाची सोय लावण्यात जीवाचा आटापिटा करणाऱ्या सर्वसामन्य नागरिकास नांदेड-यवतमाळ-आदिलाबाद येथे रूग्णासोबत जाऊन उपचार करण्याचा खर्च परवडेणा झाला आहे. तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या बाबीकडे गांभीर्याने पाहून महत्वाचे म्हणून विशेष बाब म्हणून माहूर कोविड केअर सेंटर येथे रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजन सुविधा उपलब्ध करून द्याव्या असे साकडे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक प्राचार्य राजेंद्र केशवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना सादर केलेल्या निवेदनात घातले आहे.
राजकिरण देशमुख, नांदेड/माहूर