पुण्यातली विसर्जन मिरवणूक परंपरेनुसारच होणार, पण.. हायकोर्टाच्या निर्णयाने धाकधूक वाढली
सध्या राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. मुंबई, पुण्यासह राज्यातील मोठ्या शहरांपासून कोकणातील खेड्यापर्यंत सगळीकडे उत्साह पाहायला मिळत आहे. अशात मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. पुण्यातील मानाच्या 5 गणेश विसर्जन मिरवणुकीच्या परंपरेला आव्हान देणारी ऐनवेळीची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. पण त्याचवेळी रूढी म्हणजे कायदा नसल्याचंही परखड मत हायकोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे यंदापुरता हा वाद टळला असला तरी पुढच्यावर्षी पुन्हा हा प्रश्न उद्भवू शकतो.
देशातील वाघांची संख्या वाढणार, नॅशनल पार्कमध्ये लवकरच येणार नवीन पाहुणा!
मुंबई मधील संजय गांधी नॅशनल पार्क हे देशातील पर्यटकांचं आकर्षण केंद्र आहे. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी या ठिकाणी आहेत. येथील वाघ पाहण्यासाठी पर्यटक येथे मोठ्या संख्येने गर्दी करत असतात. अशातच येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. येत्या काही महिन्यातच येथील वाघांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण संजय गांधी नॅशनल पार्क मधील वाघीण श्रिवल्ली गर्भवती असून लवकरच येथे नवीन पाहुण्याचे आगमन होण्याची शक्यता आहे.
‘माझी तुझी रेशिमगाठी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी सर्वांची लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशिमगाठ’ सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ही मालिका पोहचली आहे.अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चा खऱ्या असून ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्यामुळे मालिकेचे चाहते आणि कलाकार भावूक झाले आहेत. मालिकेसंदर्भातील अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पारशी सायरस मिस्त्री यांच्यावर हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार
टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचे पालघर येथे झालेल्या अपघातात निधन झाले. त्यानंतर मंगळवारी मुंबईत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मध्य मुंबईतील वरळी येथील इलेक्ट्रिक स्मशानभूमीत हिंदू विधीनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मिस्त्री हे पारशी समाजातील असल्याची माहिती आहे. त्यांचे अंतिम संस्कार पारशी रितीरिवाजांऐवजी हिंदू रितीरिवाजांनुसार झाले आहेत.
शिवसेनेतील शिंदेंची जागा कुणाला हवी होती? उदय सामंत यांचा गौप्यस्फोट
शिवसेनेमधली एकनाथ शिंदे यांची जागा कुणाला तरी हवी होती, त्यामुळे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही, असा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. न्यूज18 लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये उदय सामंत बोलत होते. ‘शिंदे गटाचे आमदार गुवाहाटीला गेलेले असताना ठाकरे गटातील काही नेत्यांनी मुद्दाम या दोन्ही गटातील नेत्यांना एकत्र येऊ दिलं नाही. चर्चा होऊन नाराजीवर तोडगा निघू दिला नाही,’ असं विधान उदय सामंत यांनी केलं.
2011 च्या विश्वविजेत्या संघातील खेळाडूंचं होणार रीयुनियन, रिटायर्ड रैनाही लीजंड्स संघात सामील
सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट गाजवणारे दिग्गज फलंदाज पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत. निमित्त आहे ते भारतात होणाऱ्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचं. या ट्वेन्टी ट्वेन्टी लीग स्पर्धेत आठ देशांचे संघ सहभागी होणार आहेत. त्यात भारतासह, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. 10 सप्टेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
शेतकऱ्यांसमोर एकामागोमाग एक संकटे; गोगलगाईनंतर पिकांवर गुलाबी बोंड अळीचा हल्ला
सध्या महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यात शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत आहे. अकोला जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी बोंड अळीच्या प्रादुर्भावाने चिंतेत आहेत. यावेळी चांगले उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकरी वर्गात होती. परंतु, संपूर्ण कापूस पिकांवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे..
गडगडाटासह येत असला तरी हा परतीचा पाऊस नाही; मान्सूनच्या प्रवासाबद्दल IMD चं मोठं स्पष्टीकरण
राज्यातील विविध भागात सध्या पाऊस सुरू होत आहे. तर काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. या पावसादरम्या, ढगांचा गडगडाटही पाहायला मिळतो आहे. यामुळे हा पाऊस परतीचा आहे का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत झाला आहे. मात्र, हा पाऊस परतीचा नाही. तर मान्सूनची सक्रियता कमी झाली आहे. त्यामुळे हा पाऊस पडत आहे.
वातावरणात उष्णता आहे. तसेच आर्द्रतेचे प्रमाणही कायम आहे. त्यामुळे ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत आहे. दरम्यान, आता पुढच्या आठवड्यात तसेच त्यानंतरच्या कालावधीमध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्णाम होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सरासरी तारखेपेक्षा उशीर होऊ शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
स्कुटीवरून खाली पडणार म्हणून खांबाला हात लावला अन् बसला विजेचा धक्का, तरुणीचा दुर्दैवी मृत्यू
ऑफिसला जाऊन येणं बंगळुरूतल्या एका 23 वर्षीय तरुणीच्या जीवावर बेतलं आहे. शहरात एका रात्रीत पडलेल्या अति पावसामुळे सर्वत्र साचलेल्या पाण्यातून वाट काढत घरी येणाऱ्या या तरुणीला विजेचा धक्का बसल्याने ती मृत्युमुखी पडली. बंगळुरूच्या मराठाहळ्ळीजवळ सिद्दपुरा भागात ही दुर्घटना घडली. शहराच्या अनेक भागांमध्ये या पावसामुळे पाणी साचलं होतं.अखिला असं मृत्युमुखी पडलेल्या 23 वर्षांच्या तरुणीचं नाव आहे. ती एका खासगी कॉलेजमध्ये काम करत होती. ती रात्री कामावरून घरी परतत असताना अतिमुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचलं होतं. रस्ते जलमय झाले होते. त्यातून वाट काढत येताना तिची स्कुटी बंद पडली, त्यामुळे ही तरुणी घसरून पडणार होती. तितक्यात स्वतःला वाचवण्यासाठी तिने शेजारच्या खांबाचा आधार घेण्याचा प्रयत्न केला; मात्र दुर्दैवाने तो खांब विजेचा होता. त्यामुळे तिला आधार मिळण्याऐवजी विजेचा जोरदार झटका बसला आणि ती जागीच मरण पावली.
रस्ते अपघातासाठी कोण जबाबदार?, नितीन गडकरींनी दिलं ‘हे’ कारण
भारतातील मोठे उद्योगपती आणि टाटा उद्योग समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा रविवारी रस्ते अपघातात मृत्यू झाला.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सदोष प्रकल्प अहवालांमुळे रस्ते अपघात होतात, असे मत व्यक्त केले आहे. तसेच कंपन्यांना महामार्ग आणि इतर रस्त्यांच्या बांधकामासाठी तपशीलवार प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री म्हणाले की, सरकार नवीन तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देत आहे. “कंपन्यांनी तयार केलेले काही डीपीआर सर्वात वाईट आहेत आणि ते देशातील रस्ते अपघातांना जबाबदार आहेत,” असे गडकरी यांनी येथे एका कार्यक्रमात सांगितले.
रवींद्र जाडेजाच्या गुडघ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजाला आशिया चषकात हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली. आणि टीम इंडियाला ऐन स्पर्धेदरम्यान मोठा धक्का बसला. जाडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाल्यानं उर्वरित आशिया चषक आणि टी20 विश्वचषक स्पर्धेलाही त्याला मुकावं लागणार आहे. दरम्यान जाडेजाच्या गुडघ्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली.
भारताने दिली जगातील पहिली नसल व्हॕक्सीन; भारत बायोटेक च्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला मंजुरी
तब्बल दोन वर्षांहून अधिक कालावधी झाल्यानंतरही जगभरातलं कोरोनाचं संकट पूर्णतः कमी होत नाही आहे. भारतातदेखील सर्व प्रौढ नागरिकांना बूस्टर डोस दिला जात असतानाही दररोज मोठ्या संख्येने नवे रुग्ण आढळून येत आहेत. या सगळ्यातच आता एक चांगली बातमी समोर आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने देशातल्या पहिल्या नेझल म्हणजेच नाकावाटे दिल्या जाणाऱ्या लशीला परवानगी दिली आहे. भारत बायोटेक कंपनीने या लशीची निर्मिती केली आहे. ही जगातील पहिली लस असल्याचा दावा भारत बायोटेकने केला आहे.
SD Social Media
9850 60 3590