फिफा वर्ल्ड कपमध्ये 32 संघ सहभागी झाले होते. प्राइज मनीच्या बाबतीत फिफा स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी स्पर्धा आहे. यापेक्षा जास्त प्राइज मनी UEFA चॅम्पियन्स लीग फुटबॉलमध्ये 10.6 हजार कोटी रुपये दिली जाते तर फॉर्म्युला 1 मोटर स्पोर्ट्सच्या स्पर्धेत 6.5 हजार कोटी रुपये प्राइज मनी देण्यात येते.
फिफाच्या स्पर्धेत 3.6 हजार कोटी रुपये बक्षीस म्हणून संघांना दिले जातील. यामध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाला 359 कोटी रुपये मिळतील. ही रक्कम आयपीएलच्या टोटल प्राइज मनीच्या जवळपास 8 पट जास्त आहे. फिफा वर्ल्ड कप विजेत्या संघाला 359 कोटी रुपये तर उपविजेत्या संघाला 245 कोटी रुपये मिळतील. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघाला अनुक्रमे 220 आणि 204 कोटी रुपये मिळणार आहेत.
विशेष म्हणजे 32 व्या क्रमांकावर राहणाऱ्या संघालाही मोठी रक्कम मिळणार आहे. त्यांना 73 कोटी रुपये प्राइज मनी म्हणून दिले जातील. फिफा मध्ये क्वार्टर फायनल गाठलेल्या संघांना प्रत्येकी 139 कोटी रुपये दिले जातात. तर सुपर 16 फेरीतून बाहेर पडलेल्या प्रत्येकाला 106 कोटी रुपये मिळतील. तर 17 ते 32 स्थानावरील संघांना 73 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
टी20 वर्ल्ड कपची एकूण प्राइज मनी 45.68 कोटी रुपये इतकी आहे. तर आयपीएलमध्ये एकूण 46.5 कोटी रुपये प्राइज मनी म्हणून दिले जातात. फिफाची एकूण प्राइज मनी 3.6 हजार कोटी रुपये इतकी आहे. क्रिकेट वर्ल्ड कपच्या तुलनेत ही रक्कम 80 पट जास्त आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये विजेत्या संघाला 13 कोटी रुपये इतकी प्राइज मनी मिळते. तर आयपीएलमध्ये हीच रक्कम 20 कोटी रुपये इतकी असते.