बिटीशांपासून भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली आहेत. 15 ऑगस्ट 1947 रोजी दिल्लीतील लाल किल्ल्यावर पहिल्यांदा ध्वज फडकवण्यात आला, तेव्हा येणाऱ्या काळात देशाची एवढी प्रगती होईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. काळाच्या ओघात देशाने प्रगती तर केलीच पण अनेक क्षेत्रात स्वतःला जगासमोर सिद्ध केले. त्याचबरोबर भारताने क्रीडा जगतात अनेक यश मिळवले आहे. देशासमोर आजही क्रीडा क्षेत्रातील अशा अनेक आठवणी आहेत ज्या कधीच विसरता येणार नाहीत.
स्वतंत्र भारताचे पहिले ऑलिम्पिक
भारताने 1948 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये एक स्वतंत्र देश म्हणून भाग घेतला आणि नुसताच भाग घेतला नाही, तर ज्या देशाने भारतावर 100 वर्षे राज्य केले त्या देशाला त्यांच्याच भूमीवर अंतिम फेरीत 4-0 ने पराभूत केले, स्वतंत्र भारताचे हॉकीमधील पहिले ऑलिम्पिक पदक आपल्या नावावर केलं. त्यानंतरही भारतीय हॉकीचा सुवर्णकाळ सुरूच राहिला. ऑलिम्पिकमध्ये, स्वातंत्र्यानंतर 1952 आणि 1956 च्या ऑलिम्पिकमध्येही भारताने सुवर्णपदक जिंकले होते. बलबीर सिंगने 1952 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत संघासाठी अंतिम फेरीत 5 गोल केले होते. हे 5 गोल अजूनही रेकॉर्ड म्हणून नोंदवले गेले आहेत.
भारताचे कुस्तीतील पहिले ऑलिम्पिक पदक
त्याच वेळी, ऑलिम्पिक खेळांमध्ये, 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारताने कुस्तीमध्ये वैयक्तिकरित्या पहिले पदक जिंकले. कुस्तीमध्ये केडी जाधव यांनी 52 किलो वजनी गटात भारताला कांस्यपदक मिळवून दिले. जे 44 वर्षांपासून देशाचे एकमेव वैयक्तिक पदक होते.
ऑलिम्पिकमध्ये भारतीय फुटबॉल संघाचा दबदबा
आज भलेही परदेशात फुटबॉल जास्त खेळला जातो. पण एक काळ असा होता जेव्हा भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून फुटबॉलच्या खेळात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. 1951 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने फुटबॉलमध्ये सुवर्णपदक जिंकले आणि या विजयाचे नायक शाहू मेवाला होते. त्यांनी अंतिम फेरीत इराण विरुद्धचा सामना 1-0 ने जिंकला. सोबत 4 गोलांसह स्पर्धेत सर्वाधिक गोलही केले. फुटबॉलमध्ये भारताने 3 वेळा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे.
1975 मध्ये हॉकी विश्वचषक जिंकला
खेळांमध्ये कोणत्याही खेळाच्या सर्वात जास्त आठवणी असतील तर त्या भारतीय हॉकीच्या आहेत. 1975 मध्ये भारतीय हॉकी संघाने विश्वचषक जिंकला होता.
मिल्खा सिंग यांचे ऑलिम्पिक पदक हुकले
जगभरात फ्लाइंग शीख म्हणून प्रसिद्ध असलेले मिल्खा सिंग आज आपल्यात नाहीत, 18 जून 2021 रोजी कोरोनामुळे त्यांचे निधन झाले. पण, जेव्हा खेळाबद्दल बोललं जातं, तेव्हा मिल्खा सिंग यांचे नाव आल्याशिवाय राहत नाही. भारतातील खेळ त्यांच्याशिवाय अपूर्ण आहेत. मिल्खा सिंग यांच्याशी संबंधित अनेक आठवणी आहेत. पण 1960 च्या रोम ऑलिम्पिकमधील ती 400 मीटर शर्यत आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे. कारण त्यावेळी मिल्खा सिंग यांचे कांस्यपदक एका सेकंदापेक्षा कमी अंतराने हुकले होते.
भारत क्रिकेटमध्ये जगज्जेता झाला
स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत क्रिकेटमध्ये आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत होता. काळाच्या ओघात देशात क्रिकेटमध्येही सुधारणा होत होती. त्यानंतर 1983 साल आले जेव्हा भारतीय खेळांची परिस्थिती बदलली. आणि कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेट विश्वचषक जिंकला. हा तो काळ होता जेव्हा भारतीय खेळांना पैसा मिळवून देण्याची नवी कथा लिहिली गेली.
बुद्धिबळातही भारताचा डंका
2000 मध्ये विश्वनाथन आनंद जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत चॅम्पियन बनले. असं करणारे ते पहिले आशियाई आणि भारतीय होते. आनंद बॉबी फिशरनंतर पहिले गैर-सोव्हिएत खेळाडू होते.
नेमबाजीत भारताला रौप्यपदक
राज्यवर्धन राठोडने 2004 अथेन्स ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी प्रथमच नेमबाजीत वैयक्तिक गटात देशासाठी रौप्य पदक जिंकले.
देवेंद्र झाझरिया यांनी पॅरालिम्पिकमध्ये पुन्हा सुवर्णपदक जिंकले
अथेन्स पॅरालिम्पिक भारतासाठी आनंदाने भरलेले होते. कारण त्यावेळी देवेंद्र झाझरियाने भालाफेकमध्ये देशाला दुसऱ्यांदा सुवर्ण मिळवून दिले होते. हे पदक 32 वर्षांनंतर देशाने पॅरालिम्पिकमध्ये जिंकले.
भारत 24 वर्षांनंतर विश्वविजेता ठरला
भारतीय युवा संघाने 2007 मध्ये पुन्हा एकदा इतिहास रचला. 24 वर्षांनंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली देश टी-20 विश्वचषक विजेता ठरला. त्याच वेळी, 2011 मध्ये श्रीलंकेला पराभूत केल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाने एकदिवसीय क्रिकेटमधील बादशाही कायम ठेवत विश्वचषक जिंकला.
लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिलांचा विजयी पताका
2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये, एमसी मेरी कोमने बॉक्सिंगमध्ये कांस्यपदक जिंकले, तर बॅडमिंटनमध्ये सायना नेहवालने भारताला आणखी एक कांस्यपदक मिळवून दिले. यासह भारताला ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच दोन महिला पदक विजेता मिळाल्या.
सचिन तेंडुलकरचा नवा विक्रम
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमधील 51 वे शतक झळकावून 100 आंतरराष्ट्रीय शतके करणारा पहिला फलंदाज बनला आहे.
पदक हुकले पण दीपा करमाकरने मन जिंकले
2016 च्या रिओ ऑलिम्पिकमधील पहिली भारतीय जिम्नॅस्ट दीपा करमाकरचे कांस्यपदक काही गुणांनी हुकले. पण, तिने तिच्या उत्कृष्ट कामगिरीने संपूर्ण जगाची आणि देशाची मने जिंकली.
भालाफेकमध्ये नीरज चोप्राने इतिहास रचला
नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. भालाफेकमध्ये त्याने 87.58 मीटर फेक करून पहिले पदक जिंकले.