पुंछ भागात चकमकीत भारतीय
सैन्य दलाचे ५ जवान शहीद
जम्मू काश्मीरमधील पुंछ भागात आज (११ ऑक्टोबर) दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे ५ जवान शहीद झालेत. यात एका ज्युनियर कमिशंड ऑफिसरसह ४ सैनिकांचा समावेश आहे. पूर्ण परिसर सील केला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे, अशी माहिती सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिलीय.
हा बंद केंद्रात असणाऱ्या
भाजपाच्या सरकारसाठी धडा
महाराष्ट्र बंदचा नारा महाविकास आघाडीच्या सरकारतर्फे देण्यात आला आहे. त्या घटनेच्या विरोधात महाराष्ट्र बंद आहे. नरेंद्र मोदींचे, भाजपाचे सरकार केंद्रात आल्यानंतर जीएसटीच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना चिरडण्याचे काम सुरु झाले आहे. म्हणून व्यापारीही या बंदमध्ये सहभागी झाले आहेत. राज्य सरकारतर्फे होत असलेला हा बंद केंद्रात असणाऱ्या भाजपाच्या सरकारसाठी धडा आहे,” असे नाना पटोले म्हणाले.
बंद दरम्यान वरणगावमध्ये
कार्यकर्त्यात हाणामारी
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला भुसावळमधील वरणगावमध्ये हिंसेचे गालबोट लागले आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरामध्ये महाविकास आघाडी व भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र पहायला मिळालं. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना केलेल्या हाणामारीमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. दोन्ही बाजूकडील जखमी कार्यकर्त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
सेरेना हॉटेलमधील अमेरिकन
नागरिकांनी त्वरित बाहेर पडावे
सेरेना हॉटेलमध्ये किंवा त्याच्या जवळ असलेल्या अमेरिकन नागरिकांनी सुरक्षेच्या कारणास्तव या भागातून त्वरित बाहेर पडावे.”, असा इशारा अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने दिला आहे. ब्रिटन स्टेट डिपार्टमेंटने अफगाणिस्तानला प्रवास न करण्याच्या आपल्या सल्ल्याच्या अपडेटमध्ये म्हटले आहे, “वाढत्या जोखमीमुळे तुम्हाला (नागरिकांना) हॉटेलांपासून (विशेषतः काबूलमधील सेरेना हॉटेल) दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.”
आर्यन खान प्रकरणातील
सुनावणी आता बुधवारी
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रुज शिप ड्रग्ज प्रकरणी आजही दिलासा मिळाला नाही. मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर त्याच्या जामिनावरील सुनावणीसाठी पुढची तारीख दिलीय. पुढील सुनावणी बुधवारी (१३ ऑक्टोबर) होणार आहे. सुनावणी दरम्यान आर्यन खानचे वकील अमित देसाई यांनी गर्दी होत असून त्यात कोरोनाशी संबंधित शारीरिक अंतराचं पालन होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. न्यायालयाने केवळ ज्येष्ठ वकिलांनाच सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश दिलेत.
पान मसालाच्या जाहिरातीचे
अमिताभ बच्चन यांनी परत केले मानधन
बिग बी अमिताभ बच्चन यांना त्यांच्या पान मसालाच्या जाहिरातीमुळे काही दिवसांपूर्वी टीकेचा सामना करावा लागला होता. यावेळी टीका करणाऱ्यांना उत्तर देत बिग बींनी देत स्पष्टिकरण देखील दिलं होतं. मात्र त्यानंतर आता बिग बींनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी पान मसाला कंपनीसोबत जाहिरातीसाठी केलेला करार मोडला आहे. एवढचं नव्हे तर या जाहिरातीसाठी मिळालेलं मानधन देखील त्यांनी परत केलं आहे.
पत्नीच्या खोलीत कोब्रा
नाग सोडून केली हत्या
पत्नीच्या खोलीत कोब्रा जातीचा नाग सोडून त्याच्याद्वारे सर्पदंश करवून आपल्या पत्नीची हत्या केल्याप्रकरणी केरळमधला एक व्यक्ती दोषी आढळला आहे. आरोपी सूरजने आपली २५ वर्षीय पत्नी उत्तराचा हुंड्यासाठी छळ करुन हत्या केल्याचा आरोप आहे. कोल्लम सत्र न्यायालयाने या प्रकरणी निकाल दिला असून बुधवारी शिक्षेची सुनावणी होणार आहे. पत्नी उत्तरा कोल्लमपासून ४० किलोमीटरवर असलेल्या तिच्या मामाच्या घरात राहत होती. झोपेत असताना तिला नाग चावला, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
रशियात मोठी विमान दुर्घटना
१६ प्रवाशांचा मृत्यू
रशियात मोठी विमान दुर्घटना झालीय. एल ४१० हे विमान रशियातील तातारस्तान भागात कोसळून यात १६ प्रवाशांचा मृत्यू झालाय. याशिवाय ७ प्रवासी जखमी झालेत. या विमानात पॅराशूट जंपरचा एक गट प्रवास करत होता. रशियाच्या आपत्कालीन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार दुर्घटनाग्रस्त विमानातून ७ प्रवाशांना वाचवण्यात यश आलंय. दुर्घटनाग्रस्त एल ४१० हे विमान दोन इंजिनचं आणि कमी अंतराचं वाहतूक विमान आहे. इंजिन खराब झाल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आलीय.
अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते
मराठा नको : गिरीश महाजन
अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते मराठा नको, अर्ध्या मंत्रिमंडळाला वाटते ओबीसी नको, असा थेट आरोप करत भाजप नेते गिरीश महाजन यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते नाशिकमध्ये आले असता बोलत होते. महाजन यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकावर चौफेर टीका केली.
SD social media
9850 60 3590