सध्या बॉलीवूडमध्ये सर्वात आघाडीचा असलेला तसेच आपल्या हटके लूकमुळे नेहमी प्रसिध्दीत असलेला अभिनेता रणवीर सिंग तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. रणवीर व दिपीका पदुकोन नेहमी आपल्या चाहत्यांसाठी एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. फेसबूक, इस्टावर त्यांना लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळत असतात. रणवीरचा फीट (fitness) आणि फाईन लूक हा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र ठरत असतो. चाहत्यांसमोर येताना त्याचा लूक नेहमीच हटके असतो. त्यामुळे अगदी सर्वांच्याच नजरा त्याच्यावर खिळून असतात.
आपली केशरचना, कपड्यांची ठेवन आदींच्या माध्यमातून रणवीर नेहमीच चर्चेत असतो. यासोबतच त्याच्या फिटनेसमुळेही अनेक तरुण त्याला आपला आदर्श मानत असतात. तो केवळ चित्रपटातच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही उत्साहाने भरलेला दिसतो. प्रत्येकाला त्याच्यासारखे बनण्याची इच्छा असते. पण तुम्हाला माहित आहे का त्याच्या फिटनेसचे रहस्य काय आहे?
‘आस्क मी एनिथिंग’ या कार्यक्रमादरम्यान रणवीर सिंगने त्याच्या फिटनेसची रहस्ये चाहत्यांसोबत शेअर केली. जेव्हा रणवीरला विचारण्यात आले की ‘तू नाश्त्यात काय खातोस, तेव्हा तो म्हणाला, ‘मी दिवसाची सुरुवात 130 ग्रॅम ओट्स, 15 ग्रॅम नट्स आणि 5 ग्रॅम चॉकलेट चिप्सने करतो.’ त्यानंतर रणवीरने सांगितले की तो सकाळी लवकर डिटॉक्स ड्रिंक तसेच प्रतिकारशक्ती वाढवणारे शॉट्स घेतो. हे सर्व केल्यानंतर, तो प्रोबायोटिक ड्रिंक आणि शिलाजित, अश्वगंधा आणि खजूराचे लाडू खातो.
शिलाजीत ‘टेस्टोस्टेरॉन’ वाढवण्याचे काम करते. शिलाजीत हे आयुर्वेदिक उपायांसाठी ओळखले जाते आणि शरीरात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी ते प्रभावी असल्याचे मानले जाते. शिलाजीत आणि अश्वगंधा दोन्ही मानसिक ताण-तणाव कमी करण्यास मदत करतात. दरम्यान, रणवीर लवकरच ‘सर्कस’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार आहे.