दम्याच्या रुग्णांनी औषधांबरोबरच आहाराची घ्यावी अशी काळजी; अस्थमा अॕटेक ची नाही राहणार भीती

दमा हा असा आजार आहे ज्यामुळे वरवर पाहता ती व्यक्ती ठीक वाटत असली तरी, ती बरी नसते केव्हाही त्यांनी दम्याचा अटॅक येऊ शकतो. याच भीतीत दम्याचे पेशंट जगत असतात. कोरोना काळात दम्याच्या रुग्णांना स्वत:ची जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. ज्यांना श्वसनासंबंधी त्रास आहेत किंवा श्वासोश्वासाचे आजार आहेत, अशा लोकांनी काळजी घ्यावी.

दमा हा एक दीर्घकाळ टिकणारा आजार आहे, त्यामुळे दीर्घकालीन उपचारांची आवश्यकता असते. श्वासोच्छवासाला त्रास, छातीत दुखणं, खोकला आणि अस्वस्थ वाटणं असा त्रास दम्याच्या रुग्णांना होतो. शरीरातील कफ वाढणं आणि अरुंद श्वासनलिका याशिवाय इतरही अनेक कारणांमुळे दम्याचा अटॅक येऊ शकतो. दम्याच्या रुग्णांना इनहेलर वापरावं लागतं. याबरोबर त्यांनी आहाराकडेही विशेष लक्ष द्यायला हवं.

दम्याच्या रूग्णांचा आहार

लिंबूवर्गीय फळे

व्हिटॅमीन सीमध्ये ऍन्टीऑक्सिडंन्ट मुबलक प्रमाणात असतं. ज्यामुळे फुफ्फुसांचं संरक्षण होतं. व्हिटॅमीन सीयुक्त आहार घेणाऱ्यांमध्ये दम्याचा अटॅक येण्याचा धोका कमी असतो. दम्याच्या रूग्णांनी लिंबू संत्रा, ब्रोकोल, किवी नक्की खावेत.

मध आणि दालचिनी

दम्याच्या रुग्णांसाठी मध आणि दालचिनी यांचं मिश्रण खूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मध, 2 ते 3 चिमूटभर दालचिनी पावडरबरोबर घेतल्यास फुफ्फुसांशी संबंधित रोग देखील दूर होतात.

तुळस

आयुर्वेदिक औषध म्हणून तुळशीला महत्व आहे. तुळशीमध्ये ऍन्टीऑक्सिडंन्ट मुबलक प्रमाणात आढळतात. चहामध्ये 2 ते 3 तुळशीची पानं घालून प्यायल्याने दम्याच्या रुग्णांमध्ये अटॅकचा धोका कमी होतो. तुळशीमुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. याबरोबर तुळस फ्लू आणि सर्दी, खोकला यासारख्या आजारांमध्येही आराम देते.

विविध प्रकारच्या डाळी

डाळींनी विविध प्रकारच्या प्रॉटिनचा सोर्स मानलं जातं. काळे चणे, मूग डाळ, सोयाबीन सारखी कडधान्य आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. याची डाळ खाल्ल्यास फुफ्फुस मजबूत बनतात आणि संक्रमणापासून बचाव होतो. त्यामुळे दम्याच्या रुग्णांनी नियमितपणे डाळी खाव्यात. याशिवाय डाळीमुळे पचनशक्तीही सुधारते.

हिरव्या भाज्या

हिरव्या भाज्या फुफ्फुसांसाठी खूप फायदेशीर असतात. हिरव्या भाज्या खाल्ल्यामुळे फुफ्फुसात कफ जमा होत नाही. त्यामुळे दम्याचा त्रास होण्याची शक्यता कमी होते. हिरव्या भाज्या खाल्ल्यास रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.