पावसाळा सुरू होण्याआधी केलेल्या सर्वेक्षणात नाशिक शहरातील तब्बल 1184 वाडे धोकादायक असल्याचं धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणी हे धोकादायक वाडे रिकामे करण्यासंदर्भात संबंधित लोकांना महापालिका प्रशासनाकडून नोटीस देण्यात आली आहे. हे धोकादायक वाडे लवकरात लवकर रिकामे करण्यात आले नाही, तर मनपा प्रशासन स्वतः धोकादायक वाडे रिकामे करतील अशा पद्धतीची माहिती मनपा कैलास जाधव यांनी दिली आहे.
अनेक वर्षांपासून या धोकादायक वाड्यांचा प्रश्न प्रलंबित
खरंतर आतापर्यंत नाशिक शहरात पावसाळ्यात धोकादायक वाडे कोसळून अनेकांचे मृत्यू झाले आहेत. यात काही जण गंभीर जखमी देखील झाले आहेत. असं असताना देखील गेल्या अनेक वर्षांपासून या धोकादायक वाड्या संदर्भात अद्याप कायमचा तोडगा निघू शकलेला नाही.
धोकादायक वाड्यातील नागरिकांनी किमान पावसाळा संपेपर्यंत दुसरीकडे राहायला जाणं गरजेचं
या वर्षी देखील शहरात तब्बल 1184 वाडे धोकादायक असल्याचं निष्कर्ष मनपा कडून काढण्यात आला आहे. त्यामुळे या धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी किमान पावसाळा संपेपर्यंत तरी इथून दुसरीकडे राहायला जाणं गरजेचं आहे. मात्र, यावर कायमचा तोडगा काढण्याची देखील गरज आहे.