कबुतर पकडणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. कबुतर पकडण्यासाठी विहिरीत उतरलेल्या तरूणाचा पाय घसरल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जळगाव जिल्ह्यातील शेळगाव शिवारात ही घटना घडली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. करण उर्फ कालू चुडामण भिल असे मृतक तरूणाचे नाव आहे.
विहिरीत कबुतरांचे घरटे असल्याने त्यांना पकडण्यासाठी करण विहिरीत उतरत होता. त्यावेळी त्याचा पाय निसटला आणि तो 200 फुट खोल विहिरीतील कोसळला. विहिरीत पाणी जास्त होते आणि याच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. काका विहिरीत पडल्याचे पाहून पुतण्या सम्राट हा धावत गावात येवून माहिती दिली.