खासदार नवनीत राणा आज नागपुरात येणार असून हनुमान चालिसा पठण करणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नागपुरात खासदार नवनीत राणा यांचे आगमन व हनुमान चालिसा पठण कार्यक्रम होणार आहे. जवळपास 2 वाजता त्यांचा हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम होईल. त्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान पठण कार्यक्रम सकाळी 12 वाजता सुरू होईल. तो पण राम नगरच्या मंदिरात आहे.
नवनीत राणांच्या तक्रारीची दखल
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीची गंभीर दखल संसदीय समितीने घेतली आहे. खार पोलीस ठाण्यात आपल्याला चुकीची वागणूक दिली गेल्याचा आरोप राणांनी आपल्या तक्रारीत केला आहे. त्यांच्या याच आरोपांवर आता दिल्लीत फैसला होणार आहे. संसदीय समितीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक, मुख्य सचिव, मुंबईचे पोलीस आयुक्तांसह आणखी एका बड्या अधिकाऱ्याला 15 जूनला दिल्लीत हजर राहण्याचा आदेश दिला आहे. या सर्व बड्या अधिकाऱ्यांची आता दिल्लीत चौकशी होणार आहे.