पाण्याच्या शोधात आलेले बिबटे विहिरीत पडल्याच्या घटना आपण अनेक वेळा ऐकल्या असतील. पण शिकार करणाऱ्यासाठी आलेल्या बिबट्या थेट विजेच्या रोहित्रावर चढला त्यामुळे वीजेचा धक्का बसल्यामुळे त्याचा जागीच जळून मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यातील जयपूर इथं ही घटना घडली आहे.
रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात बिबट्याने रोहित्रावर उडी मारून प्राण्याची शिकार करण्याच्या प्रयत्न केला. पण विजेचा धक्याने जागीच ठार झाल्याची घटना आज उघडकीस आली. जयपूर येथे नदी काठी शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज पुरवठा करणारे रोहित्र बसविलेले आहे. त्या परिसरात माकडं आणि इतर प्राण्याचा वावर आहे. बिबटे प्राण्याच्या शिकारीसाठी या परिसरात आल्याने शिकार करताना रोहित्रावर उडी मारली पण तो विजेच्या डीपीवर अडकला.
विजेच्या जोराचा धक्का लागल्यामुळे बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी शेतकरी रोहित्रावर वीज पुरवठा खंडित झाल्याने डीपीजवळ गेले असता त्यांना डिपीवर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.
या घटनेची माहिती वनविभागाला आणि पोलिसात देण्यात आली. घटनास्थळी वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक गजानन बोबडे,वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय आगासे, मानद जिवसक्षक कौशल मिश्रा, डॉ. मीना काळे, डॉ. शिल्पा मून, डॉ. भिसेकर, आणि सेलू पोलीस स्टेशनचे पोलीस सरपंच, यांच्या उपस्थितीत पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. या परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने शेतकरी धास्तावले आहे.