जीवनात झाडांना आणि वनस्पतींना खूप महत्त्व आहे. त्याशिवाय आपल्याला जीवनाची कल्पनाही करता येत नाही. धार्मिक श्रद्धा आणि वास्तुशास्त्रातही झाडे आणि वनस्पतींचे महत्त्व सांगण्यात आले आहे. झाडे आणि वनस्पती या केवळ हिरवळ आणि शुद्ध हवा देत नाहीत तर त्या शुभ आणि अशुभ घटनांशीही संबंधित आहेत. वास्तुशास्त्रामध्ये अशा अनेक वनस्पतींबद्दल सांगितले आहे, ज्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळवून देतात आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतात. हिंदू धर्मात तुळशीसह अशा अनेक वनस्पती आहेत, ज्यांना पवित्र आणि पूजनीय मानले जाते. त्यांची रोज पूजा केली जाते. शुभ कार्य आणि धार्मिक विधींमध्ये या वनस्पतींचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की, ज्या घरात ही झाडे हिरवीगार असतात, त्या घरात कधीही पैशांसंबंधी समस्या येत नाहीत. अशा घरात देवी लक्ष्मीचा सदैव वास असतो.
मात्र, वास्तुशास्त्रानुसार ही झाडे अचानक सुकणे किंवा कोमेजणे अशुभ मानले जाते. हे भविष्यात घडणाऱ्या अशुभ घटनांचे ते संकेत असतात. पुरेशी काळजी घेऊनही जर ही झाडे घरात सुकत असतील तर त्याचा परिणाम तुमच्या प्रगतीवर आणि आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. कोणती झाडे घरामध्ये सुकणे अशुभ मानले जाते, याविषयी दिल्लीचे आचार्य गुरमीत सिंह यांच्याकडून जाणून घेऊया.
तुळस –
तुळशीची वनस्पती ही पूजनीय वनस्पती आहे. ही वनस्पती जवळजवळ प्रत्येक घरात आढळते आणि तिची दररोज पूजा केली जाते. असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे हिरवे रोप असेल तेथे सुख, समृद्धी आणि सकारात्मकता वास करते. या वनस्पतीमध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते, त्यामुळे तुळशीचे रोप अचानक सुकले किंवा कोमेजले तर देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपल्याचे लक्षण आहे. अशा परिस्थितीत तुम्हाला भविष्यात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. घरातील तुळशीचे रोप पूर्णपणे सुकले असेल तर ते लगेच काढून नवीन रोप लावावे आणि नियमित पाणी अर्पण करून पूजा करावी. घरामध्ये सुकलेले तुळशीचे रोप अशुभ मानले जाते.
शमी –
हिंदू धर्मात शमीची वनस्पती अत्यंत पवित्र मानली जाते. ज्या घरात शमीचे रोप असते त्या घरात शनिदेवाची वाईट दृष्टी नसते. शमीची वनस्पतीही भगवान शंकराला प्रिय आहे. घरामध्ये शमीचे रोप हिरवेगार असल्यास सकारात्मक उर्जा येते आणि घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही, त्यामुळे वाळलेल्या शमीचे रोप घरी राहणे अशुभ स्थितीचे लक्षण मानले जाते.
अशोक –
घराच्या अंगणात, बागेत किंवा बाल्कनीमध्ये जिथे अशोकाचे झाड किंवा रोप लावले जाते, तिथे नेहमी सकारात्मक ऊर्जा असते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ (मुख्य गेट) लावणे शुभ मानले जाते. अशोक वृक्ष सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवतो. असे मानले जाते की अशोकाचे रोप किंवा झाड सुकवल्याने घरातील सुख-शांती भंग पावते.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. sdnewsonline त्याची हमी देत नाही.)