आज दि.११ जून च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

भारतात २४ तासात देशामध्ये
८ हजार नवे करोना रुग्ण

भारतात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. आटोक्यात आलेला करोना आता पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या २४ तासात देशामध्ये ८ हजार ३२९ नवे करोना रुग्ण आढळून आले असून सक्रिय रुग्णांची संख्या ४० हजार ३७० वर पोहचली आहे.

कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय,
सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य

देशात कोरोना व्हायरसचं वाढतं प्रमाण पाहता कर्नाटक सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानुसार, पुन्हा मास्क घालणं अनिवार्य केलं आहे. राज्यातील सार्वजनिक ठिकाणं, मॉल्स, वेटर्स, दुकानदार आणि कारमध्ये मास्क घालणं बंधनकारक करण्यात आल्याचा आदेश राज्य सरकारने शुक्रवारी जारी केला. बंगळूरूमध्ये एका दिवसात 494 पॉझिटीव्ह
आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, कर्नाटकमध्ये एका दिवसात 525 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, परंतु सर्वाधिक लोक बेंगळुरूमध्ये संक्रमित आढळलेत. 525 पैकी 494 प्रकरणं ही केवळ बंगळुरूमध्ये नोंदवली गेली आहेत. सकारात्मक बाब म्हणजे, या व्हायरसमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही.

एक जुलैपासून वाढणार
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 1 जुलैपासून वाढणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार 1 जुलैपासून महागाई भत्त्यात (डीए हाइक) 5 टक्क्यांनी वाढ होऊ शकते. वास्तविक, DA मधील वाढ AICPI च्या डेटावर अवलंबून आहे. मार्च 2022 मध्ये AICPI निर्देशांकात वाढ झाली होती, त्यानंतर हे निश्चित आहे की सरकार महागाई भत्ता (DA) 3 नव्हे तर 5 टक्के वाढवू शकते. याला मंजुरी मिळाल्यास कर्मचाऱ्यांचा डीए 34 टक्क्यांवरुन 39 टक्के होईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 27 हजारांहून अधिक वाढ होऊ शकते.

सोनिया गांधीसोबत राहुल गांधींना
कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीचे समन्स

नॅशनल हेराल्ड’शी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ED) ने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा समन्स बजावले आहे. सोनिया गांधी यांना २३ जून रोजी चौकशीसाठी ईडीसोमोर हजर राहण्यास सांगितले आहे. या अगोदरही सोनिया गांधी यांना समन्स बजावण्यात आला होता. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे त्यांनी ईडीकडे वेळ मागितला होता. कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सोनिया गांधीसोबत राहुल गांधींनाही ईडीने समन्स बजावले होते. २ जूनला राहुल यांना चौकशीसाठी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले होते. परंतु राहुल गांधी देशाबाहेर असल्यामुळे त्यांनी आणखी काही दिवसांची मुदत मागितली होती.

पुढचे 4 दिवस वाऱ्यासह
पावसाचा इशारा

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं आगमन झालं आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा पुढचे 4 दिवस देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नगर, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांमध्ये पुढचे दोन दिवस मुसळधार पाऊस असेल असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारदरा, बुलढाणा, चंद्रपूर आणि विदर्भातही 13 आणि 14 जूनला वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज आहे.

कोकण रेल्वेचे उद्या पासून
पावसाळी वेळापत्रक लागू

मान्सून कोकणात दाखल झाला आहे. मान्सूनसाठी कोकण रेल्वेनं पूर्ण तयारीही केली आहे. आता मान्सून वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. हे वेळापत्रक उद्यापासून लागू होणार असल्याची माहिती मिळाली आहे. कोकण रेल्वे उद्या पासून पावसाळी वेळापत्रक लागू करण्यात आली असून या मार्गावरील गाड्या पावसाळी वेळापत्रकानुसार 10 जून ते 31 ऑक्टोबर या कालावधीत धावणार आहेत.

घरे जाळून 20 वर्षीय
तरुणीची जमावाकडून हत्या

इगतपुरी तालुक्यातील अधरवड येथील कातकरी वस्तीतील पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्राला हादरवणारी घटना घडली. 20 वर्षीय तरुणीची जमावाकडून हत्या करण्यात आली आहे. कातकरी कुटुंबाची घरे जाळून टाकण्यात आली. इगतपुरी तालुक्यातील खळबळ माजली आहे. एका टोळक्याकडून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. बारशिंगवे या भागातील हे टोळके असून तेही आदिवासी समाजाचे आहेत. जमिनीच्या वादामधून हा प्रकार झाल्याचे प्राथमिक माहिती आहे. घोटी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.

राज्यसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक
वगैरे अजिबात नाहीत : अध्यक्ष शरद पवार

राज्यसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक वगैरे अजिबात नाहीत, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस तसेच भाजपच्या कोट्यात फरक पडला नाही. पण अपक्षांच्या मतांच्या कोट्यात गंमती झाल्यात असं पवार यांनी म्हटल आहे. विरोधकांकडे जाणारं अपक्षांचं एक मत प्रफुल्ल पटेल यांना मिळाल्याचा दावा पवार यांनी केला आहे. मात्र पवारांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांचंही कौतुक केलं. हा निकाल माझ्यासाठी अनपेक्षित असा अजिबात नाही. प्रत्येकाकडे असलेल्या मतांच्या संख्येचा विचार करता हा निकाल अपेक्षित होता.

केंद्राकडून राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी वेठीस

केंद्राने अचानक किमान आधारभूत दराने हरभरा खरेदी बंद केल्याने राज्यातील हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याने अचानक केंद्राकडून हरभरा खरेदी करण्याचे थांबवण्यात आले आहे. यामुळे चांगल्या प्रतीचा हरभरा बाजार विकण्यासाठी गेल्यास हमीभावापेक्षा कमी दरात विक्री होत असल्याने शेतकऱ्यांची द्विधा अवस्था झाली आहे. दरम्यान केंद्राकडून हरभरा उत्पादकांना पुन्हा एकदा हरभरा खरेदी सुरू होण्याची प्रतीक्षा लागली.

अमिताभ बच्चन, अमिताभ
बच्चन है : सुप्रिया सुळे

कधी कधी अमिताभ बच्चन यांचाही चित्रपट ‘फ्लॉप’ होतो, मात्र ‘अमिताभ बच्चन, अमिताभ बच्चन है’. आमचे नेते ५० वर्षांहून अधिक काळ सत्तेत आहेत. त्यापैकी अर्धी वर्षे ते विरोधात, तर अर्धी वर्षे सत्तेत आहेत. केंद्र सरकार दडपशाही करते आहे. जास्त बोललात तर ईडीची नोटीस येते. ही निवडणूक आहे. यात आपण काही वेळा जिंकतो, काही वेळा हरतो. एकादा अपयश येत तेव्हा लोकांना असे वाटते की यांची स्ट्रॅटेजी चुकली,” असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.