आज दि.६ मे च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

नवी मुंबईत पावणे MIDC मध्ये आग, आठ कंपन्यांमध्ये धग, भीषण अग्नितांडव

नवी मुंबईत पावणे MIDC मध्ये एका कंपनीला भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. ही आग इतकी भयानक आहे की तिने आजूबाजूच्या तब्बल आठ कंपन्यांना स्वत:मध्ये सामावून घेत प्रचंड मोठा भडका उडविला आहे. एमआयडीसीमधील तब्बल आठ कंपन्यांपर्यंत ही आग पसरली आहे. संबंधित परिसरात प्रचंड धुराचे लोळ पसरले आहेत. आग सातत्याने वाढताना दिसत आहे. आगीचा भडका पाहता ही आग लगेच थांबेल याची शाश्वती नाही. पण या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी सध्या दाखल झाल्या आहेत. तसेच आणखी काही गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत. आग प्रचंड मोठी आहे. विशेष म्हणजे ज्या कंपन्यांमध्ये ही आग आहे त्यामध्ये केमिकलचे ड्रम्स मोठ्या प्रमाणात आहेत. याशिवाय काही कामगारही कंपनीत अडकल्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे धाकधूक वाढली आहे. आग लागल्यापासून 70 मीटर अंतरापर्यंत आगीचा झळा लागत आहेत. त्यामुळे कंपन्यांमध्ये अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचं बचाव पथकावर मोठं आव्हान आहे.

फेसबुकवरील प्रेमामुळे मुंबईच्या तरुणीने विकलं घर-दार; शेवटी प्रियकरानेही केली फसवणूक

मुंबईतील कांदिवली भागात पोलिसांनी एका फसवणूक करणाऱ्या प्रियकराला अटक केली आहे. हा व्यक्ती फेसबुकवर चांगले चांगले फोटो शेअर करून स्वत:ला बिजनेसमॅन सांगतो. तो आपल्या फेसबुकवरुन मुंबईतील हाय प्रोफाइल मुलींशी मैत्री करतो. आणि मग प्रेमाचं नाटक करतो. आणि लग्नाचं आमिष दाखवून मुलींकडूनच लाखोंचे महागडे मोबाइल फोन गिफ्ट घेतो. इतकच नाही तर बिजनेसमध्ये तोटा झाल्याचं सांगून त्यांच्याकडून पैसे घेऊ फरार होत होता.

मालवणी विभागातील पोलिसांनी सांगितलं की, 26 एप्रिल रोजी कांदिवली पोलिसांनी या तरुणाविरोधात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. कांदिवली पोलिसांच्या डिटेक्शन टीमने आरोपीला गुजरातच्या अहमदाबादमधून 3 मे रोजी अटक करून मुंबईला आणण्यात आलं. आरोपीचं नाव कमलेश हरिराम सुतार उर्फ तनवीर आहे. याचं वय 33 आहे. आरोपी तीन वर्षांपर्यंत मॉडलिंगही करीत होता.

उद्धव ठाकरेंच्या सभेनंतर फडणवीसांची मुंबईत पुन्हा मोठी सभा, राज ठाकरेंची हिंदुत्ववादाची भूमिका-उत्तर भारतीयांच्या मुद्दावर करणार भाष्य

मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर विविध घडामोडींना वेग आला आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत पुन्हा एक मोठी सभा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 14 मे रोजी सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी म्हणजे 15 मे रोजी देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांची याआधी 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुंबईच्या सौमय्या मैदानावर सभा झाली होती. त्यावेळी फडणवीसांनी शिवसेनेवर सडकून टीका केली होती. त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे 14 मे रोजी सभा घेणार आहेत. पण त्यांच्या सभेनंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांची सभा होणार आहे. विशेष म्हणजे आगामी सभेत देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची हिंदुत्ववादाची भूमिका आणि उत्तर भारतीयांच्या मुद्दांवरही महत्त्वाचं भाष्य करणार आहेत.

यंदा वरुणराजा लवकर बरसणार, 10 दिवस आधीच होणार मान्सूनचं आगमन

सध्या देशात उन्हाचा तडाखा बसत आहे. उन्हामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. अशा आता एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे यावर्षी आता मान्सून हा भारतात 10 दिवस आधीच दाखल होणार आहे. ‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर’ या संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे. 20 किंवा 21 मे रोजी मान्सून केरळच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यानंतर तो पुढील काही दिवसात देशाच्या उर्वरित भागात बरसणार आहे, असा अंदाजही या संस्थेने वर्तवला आहे.

मनपा निवडणुकीपूर्वीच मनसेला खिंडार, दोन माजी नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठी खिंडार पडल्याची बातमी समोर आली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील दोन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गजानन पाटील आणि पूजा पाटील, अशी या दोन माजी नगरसेवकांची नावे आहेत.ते कल्याण ग्रामीण मतदार संघातील आहेत. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हा पक्षप्रवेश होणार आहेत.

राणा दाम्पत्याविरोधात ‘तो’ गुन्हा दाखल करणं भोवलं; मुंबई सत्र न्यायालयानं राज्य सरकारला सुनावलं

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करणाऱ्या निर्धार करून आलेले आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांची काल 13 दिवसांनंतर जेलमधून सुटका झाली. राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावर आज मुंबई सत्र न्यायालयानं आपलं मत नोंदवलं आहे. न्यायालयानं आपलं मत नोंदवताना राज्य सरकारला फटकारलं आहे.

राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेले अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं मुंबई सत्र न्यायालयानं निरीक्षण नोंदवताना म्हटलं आहे. यावेळी न्यायालयानं राज्य सरकारला फटकारलं आहे.

भाजप नेते बग्गा यांच्या अटकेवरुन तीन राज्यातीन पोलीस आमने-सामने! कोण जिंकेल कायद्याची लढाई?

भाजप नेते तजिंदर पाल सिंग बग्गा यांना पंजाब पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. तजिंदरसिंग बग्गा यांच्या अटकेवरून दिल्लीपासून हरियाणापर्यंत राजकीय खळबळ उडाली होती. तजिंदर पाल सिंग बग्गा याच्या अटकेनंतर पंजाब पोलिसांचे पथक मोहालीला जाण्यासाठी हरियाणामार्गे जात होते. त्यावेळी कुरुक्षेत्रात हरियाणा पोलिसांच्या पथकाने पंजाब पोलिसांना रोखले आणि बग्गा यांच्या अटकेबाबत बराच वेळ चौकशी केली. यानंतर दिल्ली पोलिसांचे एक पथक कुरुक्षेत्रातील ठाणेसर पोलीस ठाण्यातही पोहोचले, जिथे बग्गा यांना ठेवण्यात आले होते. आता दिल्ली पोलिसांचे पथक बग्गांसोबत राजधानीला रवाना झाल्याची बातमी आहे. दिल्लीत पंजाब पोलिसांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशात बग्गा यांच्या अटकेवरून दिल्लीपासून कुरुक्षेत्रापर्यंत राजकीय महाभारत सुरू आहे. 

देशात घातपाताचा कट? पाक बॉर्डरवरील भुयाराचे फोटो आले समोर, 265 फूट ऑक्सिजन पाईपही सापडला

जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यात सीमेपलीकडे जाणारे एक भुयार आपण शोधून काढल्याचे सीमा सुरक्षा दलाने म्हटले आहे. सीमा सुरक्षा दलाच्या 48 बटालियनच्या सीमा चौकी असलेल्या चक फकिरा परिसरात पाकिस्तानी भुयार आढळून आला. ही घटना बुधवारी समोर आली. तर तेच दुसरीकडे गुरुवारी गुरुवारी भारत-पाकिस्तान सीमेवर दहशतवाद्यांच्या बोगद्यात सुमारे 265 फूट ऑक्सिजन पाईप सापडला आहे. यातून मोठा कट रचण्याची तयारी होती.

पाईप मिळाल्यानंतर सीमा सुरक्षा दल सतर्कतेने शोध मोहीम राबवत आहे. हा भुयार आंतरराष्ट्रीय सीमेपासून अवघ्या 150 मीटर अंतरावर आहे. ही पाकिस्तान पोस्ट चमन खुर्दपासून फक्त 900 मीटर अंतरावर आहे. बुधवारी बीएसएफच्या विशेष तपासणी मोहिमेत हे आढळून आले. यामुळे, आगामी अमरनाथ यात्रेत अडथळे आणण्याचे पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मनसुबे उधळण्यात आल्याचा दावा बीएसएफने केला. यानंतर जम्मू विभागात अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

SD Social Media

9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.