आज दि.३० सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

महाविद्यालय दिवाळीनंतर सुरू
करण्याचा विचार आहे : उदय सामंत

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महाविद्यालय सुरू करण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी योग्य ती काळजी घेऊनच महाविद्यालये सुरू करण्याचा आमचा विचार आहे. मात्र, पटसंख्या हाच महत्त्वाचा विषय आहे. त्यासाठी कशा पद्धतीचा फॉर्मुला तयार करायचा ह्यावर विचार करुनच कॉलेज सुरू करायची आहेत. १ नोव्हेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. मात्र, मागच्या वेळी गैरसमज असा झाला की, तेव्हापासून महाविद्यालयं सुरू होणार आहेत. १ नोव्हेंबरपासून महाविद्यालयं सुरू करावीत असं यूजीसी आणि एआयसीटीईचं म्हणणं आहे. आपल्याकडे त्या काळात दिवाळी असल्याने महाविद्यालये सुरू करता येणार नाहीत. कदाचित कॉलेज सुरू करण्यात येईल.

केंद्रीय कर्मचाऱ्यांची
दिवाळी आधीच दिवाळी

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या वेतनासोबतच डबल बोनस मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी वेतन दिलं जातं. त्यामुळेच आजच केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही आनंदाजी बातमी मिळण्याची शक्यता आहे. सप्टेंबरचं वेतन हे वाढलेला महागाई भत्ता आणि एचआरएसहीत येणार असल्याने दिवाळी आधीच केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी साजरी होणार आहे. सरकारने लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांचं वेतन २८ टक्के केलं आहे तसेच केंद्राने एचआरएमध्ये मोठी वाढ केलीय.

एटीएसच्या पथकाने आणखी एका
दहशतवाद्याला केली अटक

संशयीत दहशतवादी झाकीर हुसेन शेख व रिझवान इब्राहिम मोमीन यांचा दहशतवाद विरोधी पथकाने (एसीटीएस) ताबा घेतला होता. ४ ऑक्टोबपर्यंत दोघांचाही ताबा एटीएसला मिळाला. दरम्यान, या प्रकरणात आणखी एक अटक एसीटीएसने केली आहे. आतापर्यंत ही तीसरी अटक आहे. महाराष्ट्र एटीएसने एक मोठी कारवाई करत संशयित दहशतवादी मोहम्मद इरफान रेहमत अली शेख याला अटक केली आहे.

महामार्ग वारंवार कसे रोखले
जातात ? न्यायालयाचा प्रश्न

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांकडून दिल्लीशी इतर राज्याचे जोडलेले मार्ग कायम रोखून धरले जात आहेत. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कडक पवित्रा घेतल्याचे दिसून आले, महामार्ग नेहमी कसे काय रोखले जाऊ शकतात? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला आहे. तसेच, निवारण हे न्यायालयीन स्वरूप, आंदोलन किंवा संसदीय वादविवादांद्वारे होऊ शकते. परंतु महामार्ग कसे अडवले जाऊ शकतात आणि हे कायमचे घडते? दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाचे नेतृत्व करत असलेले न्यायमूर्ती एस के कौल यांनी नोएडाच्या रहिवाशांच्या याचिकेवर सुनावणी करताना टिप्पणी केली आहे.

बलात्कारानंतर कोमार्य चाचणी घेतली,
महिला हवाई दल अधिकाऱ्याचा आरोप

कोईम्बतूर एअरफोर्स कॉलेजमध्ये ट्रेनिंगसाठी आलेल्या एका महिला हवाई दल अधिकाऱ्याने तिच्या सहकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला होता. याप्रकरणी हवाई दलाच्या एका अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडितेनं तिची कौमार्य चाचणी (टू फिंगर टेस्ट) घेण्यात आल्याचा आरोपही पोलीस तक्रारीत केला आहे. कौमार्य चाचणीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. बलात्कारानंतर कसे धमकावले गेले आणि ब्लॅकमेल केले गेले याबद्दल पीडितेने जबाब दिला आहे.

तिबोटी खंड्या ’ हा आता रायगड
जिल्ह्याचा जिल्हा पक्षी

तिबोटी खंड्या’ हा आता रायगड जिल्ह्याचा जिल्हा पक्षी असणार आहे. कर्नाळा अभयारण्यात आढळणारा अतिशय सुंदर आणि मनमोहक पक्षी आहे. ‘ओरियंटल ड्वार्फ किंगफिशर’ नावानेही हा ओळखला जातो. पर्यटन दिनानिचे औचित्य साधून पर्यटन राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालक मंत्री अदिती तटकरे यांनी रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवेळी ही घोषणा केली. जिल्ह्यात मे ते ऑक्टोबर पर्यंत तिबोटी खंड्या या पक्षाचा अधिवास आढळून येतो.

बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांना सगळीकडूनच
फटका बसतोय : छगन भुजबळ

छगन भुजबळांनी उद्धव ठाकरेंचा केलेला ‘बिचारे मुख्यमंत्री’ उल्लेख ऐकून अनेकांच्या भुवया काही क्षण उंचावल्या. मात्र, भुजबळ नेमके कोणत्या संदर्भात हे म्हणाले, हे स्पष्ट होताच उपस्थितांनी देखील त्याला सहमती दर्शवली. “ग्लोबल वॉर्मिंग वगैरे मुळे जिथे पाऊस पडायला हवा तिथे पडत नाही. जिथे पडतो तिथे खूप पडतोय. कधी दुष्काळ पडतोय. कधी पाऊस सगळंच वाहून नेतो. इथूनही फटका पडतोय, तिथूनही फटका पडतोय. बिचारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावर काम करत आहेत. या सगळ्याचं ग्लोबल वॉर्मिंग हे प्रमुख कारण आहे”, असं भुजबळ म्हणाले.

एका नाभिकाला लागला
तब्बल एक कोटींचा जॅकपॉट

बिहारमधील मधुबनी जिल्ह्यामधील एका नाभिकाला इंडियन प्रिमियर लीगच्या कालावधीत खेळण्यात येणाऱ्या ड्रीम टीम स्पर्धेमध्ये तब्बल एक कोटींचा जॅकपॉट लागलाय. मधुबनीमधील अंधारथंडी ब्लॉकमधील नानौर चौकामध्ये छोटं केशकर्तनालय चालवणाऱ्या अशोक कुमारला हे बक्षिस मिळालं आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्सदरम्यान झालेल्या सामन्यामध्ये अशोकने ५० रुपय खर्च करुन आपली ड्रीम ११ टीम निवडली होती. या सामन्यासाठी अशोकने निवडलेले दोन्ही संघांमधील सर्वच खेळाडू उत्तम खेळले आणि अशोकला जॅकपॉट लागला. अशोकला विजेता घोषित करण्यात आलं.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.