अफगाण सैन्याची माघार आणि अमेरिकेच्या सैन्याची घरवापसी झाल्यानंतर आता तालिबानचा अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापनेचा मार्ग पूर्ण मोकळा आहे. त्यामुळे तालिबानकडून कोणत्याही क्षणी सत्ता स्थापनेची आणि नव्या मंत्रिमंडळाची घोषणा होऊ शकतो. तालिबान आणि अन्य अफगाण नेता संघटनेच्या (तालिबान) वरिष्ठ धार्मिक नेते नवं सरकार आणि मंत्रिमंडळ स्थापनेच्या निर्णयावर आलेत. त्यामुळे याची केव्हाही घोषणा होऊ शकते. तालिबान संघटनेचा सुप्रीम कमांडर हिबतुल्लाह अखुंदजादा कोणत्याही परिषदेचा सर्वोच्च नेता असणार आहे. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य बिलाल करीमीने याबाबत माहिती दिलीय.
अब्दुल गनी बरादर तालिबानचा डेप्युटी लीडर आणि संघटनेचा मुख्य सार्वजनिक चेहरा आहे. बरादर अफगाणचा पुढील राष्ट्रपती होण्याचीही शक्यता आहे. त्याचे ओसामा बिन लादेनशी संबंध होते. त्याने मुल्ला मोहम्मद उमरसोबत तालिबानची स्थापना केली होती.
हक्कानी नेटवर्क आणि तालिबान 2016 मध्ये सोबत आले. यासह सिराजुद्दीन हक्कानी तालिबानचा दुसरा डिप्टी लीडर बनला.
तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा मुलगा मोहम्मद याकूब आहे. त्याला तालिबानचं सर्वोच्च पद दिलं जाण्याचीही चर्चा होती. मात्र आता त्याच्याविषयी फार कमी माहिती उपलब्ध होतेय. तो सध्या सिराजुद्दीन हक्कानीसोबत सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचं काम करत असल्याचं बोललं जातंय.
अब्दुल हकीम हक्कानी सुप्रीम कमांडर हैबतुल्लाह अखुंदजादाचा खूप जवळचा सहकारी असल्याचं मानलं जातं. हक्कानी तालिबानच्या चर्चा करणाऱ्या टीमचं नेतृत्व करत होता. त्यानेच मागील अमेरिका सरकारसोबत शांतता राखण्यासाठी चर्चा केली होती. तो धार्मिक नेत्यांच्या एका वरिष्ठ परिषदेचा प्रमुख आहे.
शेर मोहम्मद अब्बास स्टानिकजई तालिबानचा प्रमुख राजकीय नेता आहे. तो फडाफड इंग्रजी बोलतो. अफगाणिस्तानवर याआधी तालिबानची सत्ता होती तेव्हा तो डेप्युटी परराष्ट्र मंत्री होता. त्याने चीनच्या सरकारी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीचंही नेतृत्व केलं होतं.
जबीउल्लाह मुजाहिदने या आठवड्यात काबुलमध्ये तालिबानची पहिली पत्रकार परिषद घेतली. मुजाहिदचे संदेश आंतरराष्ट्रीय समुहापर्यंत पोहचवण्याची महत्त्वाची भूमिका त्याच्याकडे आहे. 20 वर्षांमधील युद्धाच्या काळात त्याने पत्रकारांशी केवळ फोन आणि मेसेजवर चर्चा केलीय.