मुंबई पुणे महामार्गावर पहाटेच्या सुमारास अपघात, 22 जण रस्त्यावर कोसळले, पाच जखमी एक ठार

डेकोरेशन साहित्याची वाहतूक करणाऱ्या गाडीला भीषण अपघात झाला. मुंबई पुणे महामार्गावर पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. यावेळी गाडीच्या टपावरुन प्रवास करणारे तब्बल 22 जण भर रस्त्यात कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी आहे. अन्य चार ते पाच जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. मुंबई पुणे महामार्गावरील अंडा पॉईंट जवळ हा अपघात झाला.

पहाटे तीन वाजताच्या सुमारास मुंबई पुणे महामार्गावरील मॅजिक पॉईंट जवळ (अंडा पॉईंट) बोरघाट येथे अपघात झाला. सहारा सिटी येथून मंडप काम करुन मुंबईकडे परतणाऱ्या डेकोरेशन साहित्याच्या गाडीला अपघात झाला. यामध्ये गाडीतील टपावर बसलेले 22 जण खाली कोसळले. त्यातील एकाला प्राण गमवावे लागले आहेत.

तर चार ते पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, लोकमान्य आरोग्य यंत्रणा, खोपोली पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी यावेळी मदतकार्य करत जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.