कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणं अनिवार्य आहे. तसेच लॉकडाऊन पूर्णपणे उठवलेला नाही. फक्त काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत, असं मोठं विधान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.
विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे. राज्यातील काही जिल्ह्यात अनलॅाकिंगला सुरुवात झाली आहे. पण पूर्णपणे अनलॅाक करण्यात आलेलं नाही. तर काही अटीच शिथिल केल्या आहेत. एकूण 43 युनिट तयार करण्यात आले आहेत. त्यापैकी 18 युनिटलाच अनलॅाकिंगची परवानगी मिळाली आहे. अजून कोरोना संपलेला नाही. त्यामुळे पुन्हा कोरोना वाढल्यास जनता जबाबदार राहील. त्यामुळे कोरोनाचे नियम पाळणं गरजेचं आहे. मास्क न घालता वावरल्यास कठोर कारवाई होईल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला आहे.
लॅाकडाऊन पूर्णपणे उठवण्यात आलेला नाही, काही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत.
कोरोना संपला नाही, कोरोनाचे नियम पाळणं अनिवार्य आहे.
अनलॉकचे पाच टप्पे नेमके कसे आहेत ?
पहिली लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.
दुसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत.
तिसरी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील
चौथी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांवर व्यापलेले असतील तर
पाचवी लेव्हल : पॉझिटिव्हिटी रेट 20 टक्क्यांवर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील
कोणत्या टप्प्यात किती जिल्हे
पहिल्या टप्प्यात 10 जिल्हे
दुसर्या टप्प्यात 2 जिल्हे
तिसरा 15 जिल्हे
चौथ्या टप्प्यात 8 जिल्हे.