आज दि.१८ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

बांगलादेशमध्ये मुस्लीम
विरुद्ध हिंदू संघर्ष पेटला

भाजपाचे नेते आणि राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी रविवारी आपल्या एका वादग्रस्त विधानाची आठवण करुन दिली आहे. भारताचा शेजारी देश असणाऱ्या बांगलादेशमध्ये हिंदूवरील अत्याचार थांबत नसतील तर भारताने बांगलादेशवर हल्ला करावा असं स्वामी यांनी म्हटलं आहे. खरं तर स्वामी यांनी हे वक्तव्य तीन वर्षांपूर्वी २०१८ साली केलं होतं. मात्र सध्या बांगलादेशमध्ये सुरु असणाऱ्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी या वक्तव्याची बातमी शेअर करत आपण अनेक वर्षांपूर्वीच इशारा दिला होता असं म्हटलंय. सध्या बांगलादेशमध्ये मुस्लीम विरुद्ध हिंदू असा संघर्ष पेटला असून त्याच्या पार्श्वभूमीवरच स्वामींनी आपल्या या जुन्या वक्तव्याचा पुन्हा एकदा दाखला दिलाय.

इस्लाम हा आमच्या देशाचा
धर्म नाही : मुराद हसन

बांगलादेशमध्ये दुर्गापूजा उत्सवादरम्यान झालेला हिंसाचार आणि अज्ञात धर्मांधांनी केलेली तोडफोड या घटनांमुळे भारतातून त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या घटनेमध्ये ४ जण ठार झाले आहे. या पार्श्वभूमवीर आता बांगलादेशचे माहिती व प्रसारण मंत्री मुराद हसन यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. विशेषत: धार्मिक कट्टरतेवर तीव्र आक्षेप घेतानाच इस्लाम हा आमच्या देशाचा धर्म नाही, अशी देखील भूमिका त्यांनी स्पष्ट केलं आहे. देशानं पुन्हा एकता १९७२ च्या राज्यघटनेनुसार राज्यकारभार करण्यची गरज देखील त्यांनी व्यक्त केली.

चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाटय़गृहे
२२ ऑक्टोबरपासून सुरू करणार

करोनामुळे राज्यात बंद असलेली चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स आणि नाटय़गृहे ५० टक्के प्रेक्षक क्षमतेच्या मर्यादेत २२ ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. नाटय़ कलावंतांसाठी लसीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. चित्रपटगृहे सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सिनेमा ओनर्स एन्ड एक्झिबिटर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

भाजपाच्या युवा नेत्याची
पश्चिम बंगालमध्ये हत्या

पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या युवा नेत्याची हत्या झाली आहे. पक्षाचे युवा शाखा नेते मिथुन घोष यांची उत्तर दिनाजपूरच्या इटाहारमध्ये हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली, अशी माहिती बंगालचे भाजपा नेते सुवेंदू अधिकारी यांनी दिली. तर, मिथुन घोष यांच्या हत्येमागे तृणमुल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप अधिकारी यांनी केला आहे. मिथून घोष यांची हत्या करणाऱ्यांना त्यांची वेळ आल्यावर योग्य कारवाई केली जाईल, असा इशारा सुवेंदू अधिकारी यांनी दिला आहे.

पाकिस्तानसोबतच्या सामन्यावर
बहिष्कार घालण्याची मागणी

काश्मीरमध्ये अशांतता असताना २४ ऑक्टोबर रोजी भारत-पाकिस्तान दरम्यान सामना होणार आहे. दहशतवादाच्या मुद्यावर भारताने पाकिस्तानशी आधीच संबंध तोडले आहेत. दोन्ही देश बऱ्याच काळापासून एकत्र कोणतीही मालिका खेळत नाहीत. पण विश्वचषक असताना भारताकडून नरमाईची भूमिका घेतली जात आहे. परंतु काही काळापासून पाकिस्तान समर्थित दहशतवादी काश्मीर खोऱ्यात सातत्याने घटना घडवत आहेत. त्यामुळे पाकिस्तानसोबतच्या सामन्यावर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे. ‘बॅन पाक क्रिकेट’ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत आहे.

अयोध्या दौऱ्यावर
राज ठाकरे जाणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. कांचन गिरीजी आणि जगतगुरू सूर्याचार्य यांनी राज ठाकरे यांना अयोध्याला येण्याचं निमंत्रण दिलं आहे. राज यांनी हे निमंत्रण स्वीकारलं असून दिवाळीनंतर डिसेंबरमधे अयोध्येत जाण्याचा निर्णय घेतला आहे. हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

श्रीलंकेचा कसोटी कर्णधार
बांदुला वरनापुरा याचे निधन

क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठी बातमी सध्यासमोर आली आहे. क्रिकेटमधील दिग्गज खेळाडूचे वयाच्या 68व्या वर्षी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. श्रीलंकेचा पहिला कसोटी कर्णधार बांदुला वरनापुरा याचे येथील एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. माजी क्रिकेटपटूला साखरेची पातळी वाढल्यानंतर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. त्याने उपचारांना प्रतिसाद देणं बंद केलं, त्याचा मृत्यू झाला आहे.

ज्या जिल्ह्यात परीक्षा त्याच जिल्ह्यातील
केंद्र देणार : डॉ. अर्चना पाटील

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परीक्षा केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. उमेदवाराने अर्ज केलेले पद ज्या नियुक्ती अधिकाऱ्याअंतर्गत येते त्याच विभागातील जिल्ह्य़ात परीक्षा केंद्र दिले गेले आहे, असे स्पष्टीकरण आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केले. पुढील आठवडय़ात होणाऱ्या परीक्षांच्या नियोजनात पुन्हा एकदा गोंधळ झाला असून, उमेदवारांच्या परीक्षा केंद्रांवरून तक्रारी सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य संचालकांनी स्पष्टीकरण केले आहे.

राज्य सेवा एमपीएससी परीक्षेच्या
390 पदांसाठी जाहिरात

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांसाठी परीक्षा घेतली जाते. आयोगानं विविध पदांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. एमपीएससीकडून उमेदवारांना महत्वाची माहिती देण्यात आली आहे. तांत्रिक कारणामुळं आणि ऑनलाईन अ‌ॅप्लिकेशन सिस्टीम अपडेट करण्यात येणार आहे. एमपीएससीच्या ऑनलाईन पोर्टलचं अपग्रेडेशन आज सायंकाळी 6 ते 6.30 या काळात होणार आहे. आयोगाकडून ट्विट करुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.

SD social media
9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.