एअरटेलचा हा प्लॅन तुमच्यासाठी आहे फायदेशीर

या सणासुदीच्या काळात, लोक जोरदार खरेदी करत आहेत. काही ऑनलाईन साईट्स वरुन देखील फेस्टीवल्समध्ये ऑफर मिळत असतात. विक्रीमध्ये अमेझॉन प्राइम वापरकर्त्यांना काही अतिरिक्त फायदे देखील देत आहेत. केवळ विक्रीच नाही तर ऍमेझॉन प्राइम इतर अनेक फायदे देते, जर तुम्हाला यांचे सबस्क्रिप्शन घ्याचं असेल तर ते खरेदी करण्यासाठी आता वेगळे पैसे खर्च करायची गरज नाही. कारण एअरटेलचा असा एक रिचार्ज प्लॅन आला आहे, जो तुम्हाला कमी किंमतीत 2.5GB डेटा देईल आणि ऍमेझॉनचा फायदा देखील. प्लॅनशी संबंधित वैधता आणि फायदे जाणून घ्या.
या एअरटेल प्लॅनसह, कंपनी दररोज 2.5 जीबी डेटा, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस ऑफर देत आहे.

एअरटेल 349 प्लॅन किती दिवसांच्या वैधतेसह येतो?
या एअरटेल प्रीपेड प्लानसह 28 दिवसांची वैधता दिली जाते आणि दररोज 2.5 जीबी डेटानुसार, हा प्लॅन तुम्हाला एकूण 70 जीबी डेटा देत आहे.

कमी किंमतीत प्रतिदिन केवळ 2.5GB डेटाच नाही, तर या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांसाठी बऱ्याच खास गोष्टी आहेत, प्लॅनसह उपलब्ध असलेल्या इतर फायद्यांविषयी माहिती जाणून घ्या. सणासुदीच्या काळात, ऍमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये प्राइम मेंबर्ससाठी काही विशेष फायदे आहेत, सेलमध्ये अन्य फायद्यांसह स्वतःचे अनेक फायदे देखील मिळत आहे. जसे फास्ट डिलीव्हरी, ऍमेझॉनवर फ्री ऍक्सेस आणि बरेच काही.

या योजनेसह, आपण हे सर्व विनामूल्य मिळवू शकता, हा प्लान 350 रुपयांपेक्षा कमी, Apollo 24/7 Circle, Shaw Academyचे विनामूल्य ऑनलाइन कोर्स आणि ऍमेझॉन प्राइम व्यतिरिक्त FasTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक देखील लाभ मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.