आज दि.२६ फेब्रुवारी च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला
यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पुण्याच्या माजी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदेशीर फोन टॅपिंगचे गंभीर आरोप झाले होते. त्यानंतर तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती स्थापन करण्यात आली. आता या समितीने आपला अहवाल सादर केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर बेकायदा फोन टॅपिंग, पोलिसांच्या बदल्या-नियुक्त्यांशी संबंधित संवेदनशील कागदपत्रे उघड केल्याचा ठपका आहे. मुंबई सायबर विभागानेही गुन्हा दाखल केला आहे.

जगाने दिर्घकाळ युद्धासाठी
तयार राहावे, फ्रान्सचा इशारा

रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला आता फक्त द्विपक्षीय स्वरूप न राहाता या युद्धाचा अवाका आता जागतिक होऊ लागला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या २८ सदस्य राष्ट्रांनी युक्रेनला युद्धविषयक मदत करण्यास सहमती दिली आहे. या पार्श्वभूमीवर रशियाविरोधात आता युक्रेनच्या बाजूने जगातल्या इतर देशांनी एकजूट होत आहे. अमेरिकेनं देखील रशियाविरोधात युक्रेनला शस्त्रास्त्रांची आणि फौजांची मदत करण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर आता रशिया, युक्रेन यांच्यातल्या युद्धाला मोठं वळण मिळालं आहे. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी “हे युद्ध आता दीर्घकाळ चालेल”, असा इशारा दिला आहे.

अमेरिकेची युक्रेनला मोठी मदत;
शस्त्रांसाठी ६०० मिलीयन डॉलर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला संरक्षण उपकरणे आणि लष्करी प्रशिक्षणासाठी ३५० दशलक्ष डॉलर्स मंजूर केले आहेत. व्हाईट हाऊसने जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की, अमेरिकेच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण असल्यास, २५० दशलक्ष डॉलर्सपर्यंतची मदत मंजूर करण्यासाठी परराष्ट्र सचिव देखील अधिकृत आहेत. युक्रेनला अमेरिकेकडून मिळणारी एकूण मदत ६०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत (अंदाजे ४ हजार ५०३ कोटींहून अधिक) आहे.

अमेरिकेचा एक्झिट प्लान
युक्रेनच्या अध्यक्षांनी नाकारला

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यामध्ये शुक्रवारी मदतीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. एपी न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, या चर्चेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी वोलोडिमिर झेलेन्स्की यांना युक्रेनमधून सुरक्षित बाहेर काढण्याचा ‘एक्झिट प्लान’ दिला. मात्र, यावेळी वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियन फौजांचा प्रतिकार करण्याचा निर्धार व्यक्त करत आपण कीवध्येच राहणार असल्याचं स्पष्टपणे सांगत अमेरिकेची मदत नाकारली आहे.

इतका बेशर्म आणि नालायक
मुख्यमंत्री पाहिला नाही : आमदार खोपडे

पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आज नवाब मलिक यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी तक्रार दाखल केली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात बेशर्म आणि नालायक असे वादग्रस्त शब्द वापरले. “या दोन वर्षात खूप भ्रष्टाचार झालाय. त्यांचे (महाविकास आघाडी सरकारचे) अनेक मंत्री भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. या राज्याच्या जनतेने आतापर्यंत इतका बेशर्म आणि नालायक मुख्यमंत्री पाहिला नाही की जो मंत्री तुरुंगामध्ये असून सुद्धा त्याचा राजीनामा घेत नाही,” असं खोपडे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटलंय.

द्वेष पसरवणाऱ्या कटेंटवर कारवाई,
फेसबुक आणि ट्विटरचे पाऊल

फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडिया कंपन्यांनी पुढाकार घेत मोठं पाऊल उचललं आहे. कटेंट आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्टवर कारवाई केली जात आहे. रशिया युक्रेन युद्धाशी निगडीत आणि द्वेष पसरवणाऱ्या कटेंटवर कारवाई करण्यात येत आहे. तसंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला जाणार यासाठी पावलं उचलली जात आहेत. फेसबुकने एक फीचर लाँच केले आहे, जेणेकरुन यूजर्स त्यांचे प्रोफाईल पिक्चर लॉक करू शकतील. फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे. तर, युक्रेनमधील ट्विटर वापरकर्त्यांना देखील सूचित केले गेले की ते त्यांचे ट्विटर खाते हॅकिंगपासून कसे सुरक्षित ठेवू शकतात. ट्विटरने युजर्सना त्यांचे अकाऊंट डिअॕक्टिव्हेट करण्यासोबतच त्यांचे ट्विटर प्रायव्हेट करण्यास सांगितले. ट्विटरने इंग्रजी, रशियन आणि युक्रेनियन भाषेत ट्विट करून माहिती दिली आहे.

व्होडाफोनच्या मदतीसाठी
एअरटेलचा तीन हजार कोटींचा करार

इंडस टॉवरमधील व्होडाफोनच्या ४.७ टक्के स्टेकसाठी आम्ही आकर्षक किंमत देणार आहोत. हा करार सुमारे ३ हजार कोटींचा असू शकतो, असे उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र या डीलच्या किंमतीबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. एअरटेलने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, या डीलद्वारे एअरटेल इंडस टॉवरद्वारे आपल्या सेवांचा विस्तार करू शकेल आणि एअरटेलच्या हिताचे रक्षण करू शकेल.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर
संभाजीराजे भोसले यांचे उपोषण सुरू

प्रलंबित मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे भोसले आक्रमक झाले असून त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. आजपासून मुंबईच्या आझाद मैदानात संभाजीराजे भोसलेंनी उपोषणाला सुरुवात केली असून यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र सरकारवर तीव्र शब्दांत निशाणा साधला. तसेच, मराठा आरक्षणासंदर्भात आणि मराठा समाजाच्या विकासासाठी राज्य सरकारनं उपाययोजनांची ब्लू प्रिंट द्यावी, अशी देखील मागणी त्यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग
तपासणी करणार

कोरोनाच्या काळात अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना बारावीची परीक्षा होईल की नाही यावर शंका होती. परंतु यावर्षी बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असल्याने विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग तपासणी करणार आहे. मागच्या दोन वर्षात परीक्षा झाली नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचा तोटा होत असल्याचे अनेक पालकाचे मत होते. तर अनेक पालकांनी त्यावर काहीतरी तोडगा काढावा असं आवाहन केलं होतं.

भारतीय दुतावासाची युक्रेनमधील
हेल्पलाइन जारी

रशिया-युक्रेन युद्धाने सारे जग होरपळून निघत आहे. भारतातल अनेक नागरिक आणि जवळपास 20 हजार विद्यार्थी सध्या युक्रेनमध्ये अडकल्याचे समोर येत आहे. भारतात केंद्र सरकारने वेगवेगळ्या हेल्पाइन तयार केल्या आहेत. नागरिकांनी त्यांची माहिती या हेल्पाइनवर द्यावी, मदत मिळेल असे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय दुतावासाची युक्रेनमधील हेल्पलाइन
+38 0997300483, +38 0997300428
+38 0933980327, +38 0625917881
+38 0935046170

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.