पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. मंगेशकर कुटुंबियांच्या हस्ते मोदींना हा पुरस्कार देण्यात आला. मोदींनी हा पुरस्कार देशवासियांना समर्पित केला. हा पुरस्कार सोहळा मुंबईतील षणमुखानंद सभागृहात पार पडला. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.
मोदी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंगेशकर कुटुंबियांसोबत असलेल्या आठवणींना उजाळा दिला. तसेच लतादीदींसोबत पहिली भेट कधी आणि कोणामुळे झाली, याबाबतही मोदी म्हणाले.
“लतादीदी वयासोबत कर्मानेही मोठ्या होत्या. सुधीर फडके यांच्यामुळे लतादीदींसोबत ओळख झाली. तेव्हापासून ते आतापर्यंत माझं जवळंचं नातं आहे. संगीताची शक्ती लतादीदींमधून दिसली. संगीत एक साधना आहे आणि भावना आहे. लतादीदीचं स्वर हे युवांसाठी प्रेरणा आहे. दीदींनी संगीत जगतावर छाप सोडली” तू लतादीदींना प्रत्यक्ष पाहिले हेच मोठे भाग्य असल्याची भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
राजकीय क्षेत्रात केलेल्या कामगिरीसाठी काही दिवसांपूर्वी मोदींना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी आज मुंबईत आले. लता दीदी आणि मोदी यांचे भावा-बहिणीचं नातं होतं.