अस्वल व रानडूकराच्या हल्ल्यात दोन पुरुष व एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना दि. ३० रोजी दत्तमांजरी व वझरा शे.फ. परिसरात घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दत्तमांजरी येथील काळे पाणी तलावार शेळ्यांना पाणी पाजण्यास घेऊन जाणाऱ्या शेळीपाल रोहिदास पूरण जाधव यांच्यावर एका आस्वलाने हल्ला करून जखमीकेल्याची घटना दुपारी १२:०० वा.घडल्या नंतर लगतच असलेल्या वझरा शे.फ. परिसरात दुपारी ३ वा.च्या दरम्यान शेतामध्ये काम करीत असलेल्या अनुसयाबाई रावसाहेब केंद्रे व श्रीराम बापू घुगे यांच्यावर रानडुकराने हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमींना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही.एन.भोसले यांनी गंभीर जखमा झाल्याने तिघानाही पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर केले आहे. दरम्यान वनपरिक्षेत्र विभागाचे वनपाल मीर साजिद अली, वनरक्षक अमोल गेडाम, निखील क्षीरसागर, यांनी ग्रामीण रुग्णालयात जखमीची भेट घेऊन अस्वल हल्ल्यातील गंभीर जखमीला उपचारासाठी तात्पुरती आर्थिक मदत केली. जखमींना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जखमीच्या कुटुंबीयाकडून वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.
राजकीरण देशमुख, माहूर