टर्म प्लान खरेदी करण्याचा प्लान करताय? मग ही माहिती असायलाच हवी

सध्याच्या जीवनात अनिश्चितता खूप वाढली आहे. अशा परिस्थितीत विमा पॉलिसी घेणे आवश्यक असते. पण जर एखाद्या व्यक्तीवर अधिक जबाबदारी असेल तर त्याच्यासाठी टर्म इन्शुरन्स घेणे अधिक फायदेशीर ठरते.

टर्म प्लान इंश्योरेंस प्लानपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो. कारण पॉलिसीधारक जिवंत असताना गुंतवणूकदाराला काहीही मिळत नाही, परंतु जर तो मरण पावला तर ते कुटुंबाला मोठी रक्कम मिळते. उदाहरणार्थ, 30 वर्षांसाठी, 500 रुपये दरमहा, तुम्हाला रु. 1 कोटी-लाइफ कव्हरसारख्या योजनेचा लाभ देते. अशा परिस्थितीत टर्म प्लॅन निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग याविषयी सविस्तर जाणून घेऊया…

टर्म प्लॅन घेताना लक्षात ठेवा की, शॉर्ट टर्म प्लॅन घेणे टाळा. साधारणपणे, टर्म प्लॅन 5, 10, 20, 30 इत्यादी वर्षांसाठी घेतले जाऊ शकतात. एक्सपर्ट्सच्या मते, शॉर्ट टर्म टर्म प्लॅन घेणे फायदेशीर नाही. शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला प्रीमियम कमी द्यावा लागतो. मात्र नंतर पॉलिसी लॅप्स झाल्यानंतर तुम्हाला जास्त प्रीमियम द्यावा लागू शकतो.

टर्म पॉलिसी घेताना स्वत:शी किंवा तुमच्या कुटुंबाशी संबंधित कोणतीही माहिती अजिबात लपवू नका. हे तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते.पॉलिसी खरेदी करताना तुमच्या मेडिकल हिस्ट्रीविषयी माहिती कंपनीला द्या. आजारांविषयी लपविल्याने नंतर क्लेम करण्यात समस्या निर्माण होऊ शकतात.तुम्ही ज्या कंपनीकडून टर्म पॉलिसी खरेदी करत आहात त्या कंपनीची हिस्ट्री अवश्य तपासा. पॉलिसी सेटलमेंटचा कंपनीचा रेकॉर्ड कसा आहे ते तपासा. त्यानंतरच तुम्ही टर्म प्लॅन खरेदी करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.