दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी 20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या ग्रुप स्टेज सामन्यात भारताने 6 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने दिलेले 119 धावांचे आव्हान भारताने 19 व्या षटकात पूर्ण केले. हा भारताचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे.
दक्षिण आफ्रिकेतील न्यूलँड्स क्रिकेट ग्राऊंड मध्ये भारत विरुद्ध वेस्टइंडीज हा सामना खेळवला जात असून या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजीची उतरलेल्या भारतीय संघाने भारताने सुरुवातीपासूनच वेस्ट इंडिज संघावर दबाव बनवला. भारतीय गोलंदाज दीप्ती शर्मा हिला 3 तर पूजा वस्त्राकर आणि रेणुका सिंह हिला प्रत्येकी 1 फलंदाज बाद करण्यात यश मिळाले. वेस्ट इंडिज संघाने 20 षटकात 118 धावा केल्या.
वेस्ट इंडिजने दिलेले आव्हान पूर्ण करताना भारताची सुरुवात काहीशी खराब झाली. स्टार फलंदाज स्मृती मानधना ही 7 चेंडूवर 10 धावा करून तर जेमिमा रॉड्रिग्स देखील 5 चेंडूत 1 धावा करून बाद झाली. शफाली वर्मा हिने भारताचा दाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु ती देखील 23 चेंडूत 28 धावा करून बाद झाली.भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाला सावरलं. तिने 42 चेंडूत 33 धावा केल्या. तर रिचा घोष ही 32 चेंडूत 44 धावा करून नाबाद राहिली. अखेर भारताने 19 व्या षटकात 11 चेंडू शिल्लक ठेऊन वेस्ट इंडिजने दिलेले 119 धावांचे आव्हान पूर्ण केले.