या सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाइल होणार नाही हँग

स्मार्टफोन आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अशा परिस्थितीत आपला मोबाईल सतत हँग होत असेल तर आपल्याला खूप चिड येते. आपण सतत फोनचं हँग होणं सहन करू शकत नाही. अशावेळी सारखं केअर सेंटरमध्ये जाणं परवडत नाही. त्यामुळे घरच्या घरी काही सोप्या ट्रिक्स वापरून आपण फोन आपला हँग होणार नाही याची काळजी घेऊ शकतो.

• तुम्ही जर Android फोन वापरत असाल तर सतत अपडेट करत राहा. त्यामुळे तुमच्या फोनला चांगला स्पीड मिळेल.
• अनावश्यक अॅप उडवून टाका किंवा डिलिट करा. नको असलेले मेसेज आणि कॉल लॉग डिलिट करा.
• फोनचं स्टोरेज भरणार नाही याची काळजी घ्या. याशिवाय एका पेक्षा जास्त अॅप जर तुम्ही रनिंग करत असाल तर तुम्हाला त्रास होऊ शकतो.
• जे App तुम्ही जास्त वापरता त्यांना अपडेट्स आले की सतत अपडेट्स करत राहा. त्यामुळे वापरण्यासाठी स्पीड मिळेल
• लाईव्ह वॉलपेपर सेट करणं शक्यतो टाळा. त्याचा परिणाम मोबाईल परफॉर्मन्सवर होतो. शक्यतो एकच वॉलपेपर ठेवा
• अनेकदा आपण न्यूज किंवा अनेक नोटिफिकेशन सुरू ठेवतो त्यामुळेही एकदम नोटिफिकेशन आले तर फोन हँग होण्याची शक्यता असते.
• मेमरी कार्डचा वापर करा. आपल्या फोनमध्ये स्पेस रिकामी ठेवा.

बॅटरी वाचवण्यासाठी या सोप्या ट्रिक्स येतील कामी
• अनावश्यक अॅप बंद करा
• Adaptive Battery किंवा Battery Optimisation पर्याय कायम सुरू ठेवा
• स्क्रीन टाइन आऊट किंवा स्क्रीन लॉक करण्याची वेळ कमी ठेवा
• बॅटरी सेव्हरचा पर्याय वापरू शकता
• नोटिफिकेशन पर्याय किंवा नेट नको असेल तेव्हा बंद करा त्यामुळेही बॅटरी वाचेल
• रनिंग अॅप्स बंद करा, नको असलेले अॅप डिलिट करा
• स्क्रीनच्या ब्राइटनेससाठी मोबाईल जास्त बॅटरी वापरतो. ऑटो ब्राइटनेस मोड बंद करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.