सोमवारी सायंकाळपासूनच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसण्यास सुरुवात झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीत सोमवारी रात्री अचानक अतिमुसळधार पावसाने झोडपून काढले. दापोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शहरातील सखल भागांत, नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचं पहायला मिळालं.
दापोली शहरातील केळकर नाका, शिवाजी नगर, नांगर बुडी, भारत नगर, जालगाव परिसरात सखल भागात अनेक लोकांच्या घरामध्ये पुराचे पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.