जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी कठोर भूमिका घेत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा केला. कुलगाम (Kulgam) मध्ये सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत दहतवाद्यांना चांगलाचं धडा शिकवला आहे. या कारवाईमध्ये कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. यामध्ये सुरक्षा जवानांनी एका तासात तब्बल 5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तात्काळ गोळीबार केल्यानंतर जवानांच्या हाती मोठ यश लागलं आहे.
जवांनाना गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी माहितीच्या आधारे ऑपरेश सुरू केलं आणि यश मिळवलं. सध्या जवानांनी चरही बाजूंनी परिसराला घेरलं आहे. अशात अनेक ठिकाणी जवान अद्यापही शत्रूचा सामना करत आहेत. कुलगाम चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये टॉप कमांडर अफाक सिकंदर, शकीर, हैदर आणि इब्राहिम यांचा समावेश आहे.
बुधवारी तासाभरात सुरक्षा दलांनी दोन चकमकीत 5 दहशतवाद्यांना ठार केले. ‘सुरक्षा दलांनी पोमबई आणि गोपालपुरा गावात झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांना ठार केलं. सध्या दोन्ही ठिकाणी चकमक सुरू असून सुरक्षा दलांनी परिसराला घेरलं असल्याची माहिती काश्मीरचे आयजी विजय कुमार यांनी दिली.
माहिती मिळाल्यानंतर जवान सतर्क होत दहशतवाद्यांच्या कुरापती मोडून काढत आहेत. अलीकडेच श्रीनगरच्या हैदरपोरा भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली होती. या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. याशिवाय दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आणखी दोघांना फाशीची शिक्षा देण्यात आली.