महाविकास आघाडीच्या युवा आमदारांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी शरद पवार यांनी ‘घाबरून जाऊ नका, भाजपला पुन्हा राज्यात येऊ देणार नाही’, असा दावा करत भाजपला थेट आव्हान दिलंय. सध्या मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. त्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी जोरदार खडाजंगी रंगलीय. या वादळी अधिवेशात सहभागी होण्यासाठी शक्यतो बहुतांश आमदार उपस्थित आहेत. त्यापैकी महाविकास घाडीच्या युवा आमदारांनी आज पवारांची भेट घेतली.
दरम्यान, पवार यांच्या या आव्हानाला आता भाजपकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय. ‘आदरणीय पवारसाहेब, भाजपची काळजी करु नका. स्वत:च्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा’, असा पलटवार भाजपनं केलाय.
आदरणीय पवार साहेब, भाजपची काळजी करू नका! स्वतःच्या पक्षाचे 60 च्या वर आमदार निवडून आणा. इतर प्रादेशिक पक्षांनी 10 वर्षात दोन राज्यात सत्ता स्थापन केली आहे, तुम्ही अजून साडे तीन जिल्ह्यातच अडकलात. 55 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत स्वतःच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनवून दाखवा!, असं प्रतिआव्हान भाजपनं पवारांना दिलंय.