कोरोनाचा संसर्ग अद्याप पुर्णपणे बंद झालेला नाही. देशात आजही कुठेना कुठे कोरोनाचे रूग्ण सापडत आहेत. परंतु देशात अधिक लसीकरण झाल्यापासून कोरोना आटोक्यात आला आहे. धुळवडीचा (holi 2022) सण देशात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील धुळवडीचा सणाला कालपासून सुरूवात झाली आहे. कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने गुरुवारी धुळवडीसाठी मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली आहे. नागरिकांनी एकत्र न येता रंगांचा सण साजरा करावा. तसेच करोना अजूनही पूर्णपणे गेलेला नाही हे लक्षात ठेवून दिशानिर्देशांचे पालन करावे, असे आवाहन सरकारने केले आहे.
मागच्या दोन वर्षात कोरोनाचा संसर्ग देशात अधिक असल्याने कुठलाच सण निर्बंधाशिवाय साजरा झाला नाही. परंतु महाराष्ट्रात कोरोनाचं प्रमाण कमी असल्याने यंदाच्या वर्षी पहिल्यासारखे निर्बंध असणार नाहीत. 18 मार्चला धुळवड तर 22 मार्चला रंगपंचमी साजरी केली जाईल. धुळवडीचा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यंदाचा हा सण साजरा करताना लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन महाराष्ट्र शासनाने केलं आहे. गेल्यावर्षी जशी धुळवडीसाठी नियमावली पाळून साजरी केली, त्याचपद्धतीने यंदाही धुळवड साजरी करावी.
धुळवडीचा सण अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा. कोरोनाचा संसर्ग वाढेल असं कोणतंही कृत्य करू नये. स्थानिक प्रशासनाने देखील कोविडयोग्य वर्तनाचे प्रभावी पालन सुनिश्चित करावे असं राज्याच्या गृह विभागाने एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सण उत्सव कमीअधिक प्रमाणात साजरे केले जात आहेत. अलीकडे महाराष्ट्रात करोना प्रादुर्भावाचा वेग मंदावला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार बुधवारी २३७ नवीन संक्रमित आणि दोन मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे होळीचा सण साजरा करताना नागरिकांनी काळजी घ्यावी.