आजपासून IPL च्या ‘रन’संग्रामाला सुरुवात, मुंबई इंडियन्सला मिळाली बुमराहची रिप्लेसमेंट
जगप्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सीजनला आजपासून सुरुवात झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा पहिला सामना होणार असून यापूर्वी आयपीएलचा उदघाटन सोहळा पारपडला. तब्बल चार वर्षांनी हा दिमाखदार सोहळा पारपडला असून या सोहळ्यात बॉलिवूड स्टार्सने चारचाँद लावले. आयपीएल 2023 ला 31 मार्च पासून सुरुवात होणार आहे. यंदा मुंबईचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह हा दुखापतग्रस्त असल्याने आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. तेव्हा मुंबई इंडियन्समध्ये बुमराहची जागा कोण घेणार याविषयी चर्चा असताना मुंबई इंडियन्सला आता बुमराहची रिप्लेसमेंट मिळाली आहे.
मुंबई इंडियन्सने अधिकृतपणे याबाबत माहिती दिली आहे. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज संदीप वॉरिअर मुंबई इंडियन्स संघात जसप्रीत बुमराहचा बदली खेळाडू म्हणून सामील होणार आहे. 2021 मध्ये भारतासाठी पदार्पण करणारा संदीप हा देशांतर्गत क्रिकेटमधला एक अनुभवी खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत 200 हून अधिक सामने खेळले असून त्यापैकी 69 सामने हे टी-20 फॉरमॅटमधील आहेत. त्याने आतापर्यंतच्या सर्व फॉरमॅटमध्ये त्याच्या कारकिर्दीत 362 विकेट घेतल्या आहेत.
विहिरीसाठी मागितली 10 हजारांची लाच, सरपंचाने अधिकाऱ्याच्या दारात उधळले 2 लाख रुपये
सरकारी काम आणि चार महिने थांब याचा प्रत्यय प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये पाहण्यास मिळतो. असाच प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहण्यास मिळाला. विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे BDO पैसे मागत असल्याचा आरोप करत एका सरपंचाने 2 लाख रुपये समितीच्या कार्यालयासमोर उधळले.गावामध्ये विहीर मंजूर करण्यासाठी पंचायत समितीचे BDO पैसे मागत असल्याचा आरोप करत, गावाच्या सरपंचाने दोन लाख रुपयांच्या नोटांच्या बंडालाचा हार गळ्यात घालून थेट फुलंब्रीचे पंचायत समिती कार्यालय गाठले आणि पैशांची उधळण केली. मंगेश साबळे असं या सरपंचाचे नाव असून फुलंब्री तालुक्यातील गेवराई पैघा या गावचे ते सरपंच आहेत.
मुंबईतून गोवा, कोकणात जाणाऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच वाहतूक कोंडी संपणार
मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कोकणचा समृद्धी महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि कोकणची भाग्यरेषा ठरलेल्या मुंबई- गोवा महामार्गावरी सर्वात मोठा कशेडी बोगदा येत्या मे महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे. दोन बोगद्यांपैकी एका बोगद्याचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून दोन पैकी एक बोगदा वाहतुकीस सुरु होणार असल्याचे महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या कशेडी घाटाला पर्याय म्हणून या बोगद्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. नोव्हेंबर 2018 मध्ये या बोगद्याच्या कमला सुरवात झाली.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! आता 60 व्या वर्षी घेता येणार रिटायरमेंट
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आता एक गुडन्यूज आहे. याचं कारण म्हणजे 58 व्या वर्षी जी रिटायरमेंट घ्यावी लागते ती आता तुम्हाला 60 व्या वर्षी घेता येणार आहे. UT प्रशासक बनवारीलाल पुरोहित यांनी चंदीगडमध्ये लागू होणार आहे.केंद्रीय सरकारी कर्मचारी निवृत्तीचे वय 60 वर्षे होणार आहे. वेतनश्रेणी आणि डीए केंद्र कर्मचार्यांसह शिक्षकांना दरमहा सुमारे 4000 रुपयांपर्यंत प्रवास भत्ता मिळेल. शाळांमध्ये आता उपमुख्याध्यापक पद असेल, सेवाज्येष्ठतेच्या आधारे नियुक्ती होणार आहे. महिला कर्मचाऱ्यांना बाल संगोपनासाठी दोन वर्षांची रजा मिळणार आहे. इयत्ता 12 पर्यंतच्या दोन मुलांच्या पालकांना शिक्षण भत्ता मिळेल.
लवकरच बदलणार मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसचं नाव? राज्य सरकारने केंद्राकडे पाठवला या नावाचा प्रस्ताव
मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनस हे पश्चिम रेल्वे वाहतुकीचं महत्त्वाचं केंद्र आहे. ब्रिटिश वास्तू विशारद क्लॉड बॅटली यांनी डिझाइन केलेलं हे स्थानक स्थानिक उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या दोन्ही गाड्यांसाठीचा एक प्रमुख ‘थांबा’ आहे. 1997 मध्ये बॉम्बेचं मुंबई असं नामकरण केल्यानंतर या स्थानकाचं नाव ‘बॉम्बे सेंट्रल’वरून मुंबई सेंट्रल असं करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा या रेल्वे स्थानकाचं नाव बदलण्याचा विचार सुरू आहे. मुंबई सेंट्रल टर्मिनसचं नाव बदलून त्याला ‘नाना शंकरशेठ’ यांचं नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारला मिळाला आहे. मात्र, त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, अशी माहिती लोकसभेत देण्यात आली.
या प्रकरणी बोलताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले की, अशा प्रकरणांमध्ये विविध सरकारी संस्थांच्या शिफारशी आणि इतर संबंधित घटकांचा योग्य विचार करून निर्णय घेतला जातो. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
प्रसाद ओकनं पुरस्कार ठेवण्यासाठी चक्क घेतलं आहे नवीन घर
प्रसाद ओक सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो त्याचे काही भन्नाट व्हिडिओ तसेच फोटो देखील चाहत्यांसोबत शेअर करत असतो. प्रसाद अभिनयाशिवाय दिग्दर्शनाची यशस्वी धुरा सांभाळताना दिसला. त्याच्या चंद्रमुखी सिनेमानं अफाट यश मिळवलं. शिवाय त्याचा धर्मवीर सिनेमा देखील हिट ठरला. त्याची दिवसेंदिवस प्रगती होत आहे. याशिवाय तो महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत दिसतो. विशेष म्हणजे प्रसादला त्याच्या धर्मवीर सिनेमातील भूमिकेसाठी नुकताच एक पुरस्कार मिळाला. या पुरस्कार सोहळ्यात त्याने एक खुलासा केला आहे. त्याच्या या खुल्याशाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
प्रसाद ओकनं धर्मवीर सिनेमात अनंत दिघे यांची भूमिका साकारली होती. या सिनेमातील प्रसाद ओकच्या अभिनयाचे सर्वांकडून कौतुक झालं. नुकताच या सिनेमातील भूमिकेसाठी प्रसाद ओकला यंदाचा मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे हा पुरस्कार त्याला त्याच्या अवडती अभिनेत्री अश्विनी भावे यांच्याकडून मिळाला. यावेळी मंचावर त्याने एक मोठा खुलासा केला. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.प्रसाद ओक जेव्हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर गेला तेव्हा त्याला निवेदकानं एक प्रश्न केला. प्रसाद ओकनं या सिनेमासाठी जे काही पुरस्कार मिळाले आहेत ते ठेवण्यासाठी एक नवीन घर घेतलं आहे, हे खरं आहे का..?.यावर प्रसादनं देखील लगेचच प्रतिक्रिया दिली. प्रसाद म्हणाला..तथास्तू.. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होऊ दे.!
महाराष्ट्रातील तरुण संशोधकांनी केरळच्या समुद्रकिनारी पालीच्या नव्या निशाचर प्रजातीचा लावला शोध
तरुण संशोधकांना निसर्ग म्हणजे फक्त अनुभवायचा नसतो, तर त्या निसर्गातील नाविन्यही शोधून काढायचे असते. महाराष्ट्रातील तरुण सध्या हेच काम करत आहे. गेल्या काही वर्षांत त्यांच्या निसर्गातील मुशाफिरीत अनेक पालींच्या, सापाच्या नवनव्या प्रजाती त्यांनी शोधून काढल्या आहेत. आताही त्यांनी उत्तर केरळच्या किनारी जंगलातून जमिनीवर राहणाऱ्या पालीची ‘चेंगोड्युमॅलेन्सिस’ ही छोटी, निशाचर प्रजाती शोधून काढली आहे.ही छोटीशी पाल जमिनीवर पानांचा कचरा आणि जंगलातील खडकांमध्ये आढळते. फळबागा आणि छत आच्छादन असलेल्या इतर भागांसारख्या अंशतः मानवी बदललेल्या लँडस्केपमध्ये आढळते. ‘चेंगोड्युमाला’ किंवा ‘कोस्टल केरळ गेकोएला’ या पाली उत्तर केरळमधील कमी टेकड्या आणि किनारी जंगलात स्थानिक आहे.
करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना मदत बंद; मविआची आणखी एक योजना बासनात
करोना मृतांच्या नातेवाइकांना सानुग्रह अनुदान म्हणून ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची योजना महाविकास आघाडी सरकारने आणली होती. मात्र, या योजनेला विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने स्थगिती दिल्याचे समोर येत आहे. या अनुदानासाठी अर्ज करण्यासाठीचे संकेतस्थळ १ मार्चपासून बंद करण्यात आले आहे. याबाबत उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत तोंडी सूचना देण्यात आल्या असून, लेखी आदेश प्राप्त झालेला नाही. दरम्यान, सध्या राज्यात आतापर्यंत करोनामुळे मृत झालेल्यांच्या नातेवाइकांनी अनुदानासाठी अर्ज केलेला असल्यास संबंधित अर्जांवर कार्यवाही सुरू आहे.
डास मारण्यासाठी लावलेली कॉइल ठरली जीवघेणी; चिमुकलीसह एकाच कुटुंबातील ६ जणांचा तडफडून मृत्यू
ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क येथील एका धक्कादायक घटनेमुळे संपुर्ण परिसर हादरुन गेला आहे. कारण शास्त्री पार्क येथील एकाच घरातील ६ लोकांचा डास मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॉईलमुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आपल्यापैकी अनेकजण घरातील डास मारण्यासाठी किंवा त्यांना पळवण्यासाठी घरामध्ये कॉईल लावतात. पण याच कॉईलने सहा जणांचा जीव घेतल्याची भयंकर घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्री पार्क भागातील एकाच कुटुंबातील ६ जणांचे मृतदेह सापडले. हे सर्व लोक झोपेत असताना डासांपासून बचाव करण्यासाठी लावण्यात आलेल्या कॉईलमुळे तयार झालेला कार्बन मोनॉक्साईड शरिरात गेल्याने या लोकांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. याबाबतची माहिती दिल्लीतील शास्त्री पार्क येथील डीसीपींनी दिली आहे.
कर्नाटकमध्ये मुस्लिमांचे आरक्षण काढले, पण जैन आणि ख्रिश्चनांना मात्र राखीव जागांचा लाभ मिळणार
कर्नाटक राज्याची विधानसभा निवडणूक जवळ आली आहे. निवडणुकीच्या आधी राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मुख्यमंत्री बोम्मई यांच्या मंत्रिमंडळाने अखेरच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुस्लीम समाजाचे मागासवर्गीय प्रवर्गात असलेले आरक्षण काढून टाकले आणि त्यांना आर्थिक मागास प्रवर्गाच्या आरक्षण गटात टाकले. धर्माच्या आधारावर मागासवर्गीय आरक्षण देता येणार नाही, अशी सबब या वेळी देण्यात आली होती. मात्र त्याच वेळी जैन (दिगंबर) आणि ख्रिश्चन धर्मीयांना मात्र मागासवर्गीय गटातून आरक्षण मिळणार आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी बोम्मई सरकारने शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाच्या गटांची पुनर्रचना केली. ज्यामुळे मुस्लीम समाजाचे चार टक्के आरक्षण काढून ते कर्नाटकातील प्रभावशाली जातसमूह वोक्कालिगा आणि लिंगायत यांच्या आरक्षणात वाढ केली.
नवजोतसिंग सिद्धू उद्या तुरुंगाबाहेर येणार! ‘या’ प्रकरणात झालेली एक वर्ष कारावासाची शिक्षा
रोड रेज प्रकरणात पटियाला तुरुंगात कैद असलेले पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नवजोतसिंग सिद्धू १ एप्रिल रोजी तुरुंगाबाहेर येतील. अधिकृत सूत्रांनी सांगितलं की, सिद्धू यांना शनिवारी तुरुंगातून मुक्त केलं जाईल. दरम्यान, सिद्धू यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देखील याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या बातमीमुळे सिद्धू समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
रोड रेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सिद्धू यांना एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर २० मे रोजी सिद्धू यांनी पटियाला कोर्टात आत्मसमर्पण केलं होतं. उद्या ते तुरुंगातून मुक्त होणार आहेत.
‘इंडिया का त्योहार’ म्हणत आयपीएलचे वाजले बिगुल
आयपीएल २०२३चा पहिला सामना गतवर्षीचा चॅम्पियन गुजरात टायटन्स आणि चार वेळा विजेतेपद पटकावणारा संघ चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघांना आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करायची आहे. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या स्वतः महेंद्रसिंग धोनीचा मोठा चाहता आहे आणि धोनीकडून तो खूप काही शिकला आहे. अशा परिस्थितीत धोनी आणि हार्दिक यांच्यातील लढत खूपच रोमांचक असेल. दोन्ही संघात काही बदल करण्यात आले असून मिनी लिलावात दोन्ही संघांनी काही चांगले खेळाडू जोडले आहेत.गुजरात संघात अष्टपैलू हार्दिक पांड्या व्यतिरिक्त फलंदाज शुबमन गिल उत्कृष्ट फॉर्मात आहे. फिरकीपटू राशिद खान अशा गोलंदाजांपैकी एक आहे जो आपली लय आणि सातत्य राखतो. अशा परिस्थितीत गुजरात संघाला पराभूत करणे हा सोपा खेळ नाही. राष्ट्रीय संघाच्या सामन्यांमुळे डेव्हिड मिलर सलामीच्या सामन्यासाठी अनुपलब्ध आहे.
राहुल देशपांडे यांनी फिल्मफेअर पुरस्कारावर कोरलं नाव
काही महिन्यांपूर्वी ‘मी वसंतराव’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला. या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल होत होते. गायक वसंतराव देशपांडे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात त्यांचे नातू लोकप्रिय गायक राहुल देशपांडे यांनी प्रमुख भूमिका साकारली. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन निपुण धर्माधिकारी याने केलं. आता या चित्रपटासाठी राहुल देशपांडे यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.‘मी वसंतराव’ या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारण्याबरोबरच राहुल देशपांडे यांनी या चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाचीही धुरा सांभाळली. या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी सिनेसृष्टीत संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटातील त्यांच्या गाण्यांनी सर्वांनाच मंत्रमुग्ध केलं. त्यांच्या याच कामासाठी त्यांना यंदाचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा मराठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.
फिल्मफेअर अवॉर्ड्सची घोषणा, ‘या’ मराठी चित्रपटाने पटकावले सर्वाधिक पुरस्कार
मराठी सिनेसृष्टीत फिल्मफेअर पुरस्काराची कायमच चर्चा असते. नुकतंच फिल्मफेअर पुरस्काराचा रंगतदार सोहळा पार पडला. या सोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी ग्लॅमरस लूकमध्ये हजेरी लावली. या पुरस्कारांची घोषणा झाली आहे.यंदाच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये आपलं स्थान मिळवणारा ‘गोदावरी’ चित्रपटाचा डंका पाहायला मिळाला. जितेंद्र जोशी निर्मित ‘गोदावरी’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. त्याबरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक निखिल महाजन, सर्वोत्कृष्ट पटकथा निखिल महाजन, प्राजक्त देशमुख, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत ए. व्ही. प्रफुल्लचंद्र आणि जितेंद्र जोशीला बेस्ट क्रिटिक्स अभिनेता म्हणून पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे ‘गोदावरी ‘चित्रपटाने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे.
राजकारणातली मोठी बातमी, शिवसेनेचे मंत्री पोहोचले शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर
राष्ट्रवादी आणि काँग्रेसमुळेच आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडलो असं म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी पवारांवर खापर फोडलं होतं. पण, आज शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आज दुपारी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले. अचानक शिवसेनेचे नेते सिल्व्हर ओकवर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नीता अंबानीच्या कल्चरल सेंटरचं उद्घाटन; रामनवमीच्या मुहूर्तावर पार पडली पूजा
भारतातील आपल्या प्रकारचे पहिले बहुविद्याशाखीय सांस्कृतिक क्षेत्र, नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्र मुंबईत सुरू होणार आहे. जिथे भारतातील आणि जगभरातील प्रेक्षक संगीत, नाट्य, ललित कला आणि हस्तकला या क्षेत्रातील भारतातील सर्वोत्तम गोष्टींचे साक्षीदार होऊ शकतात. लॉन्च आधी नीता मुकेश अंबानी यांनी या ठिकाणी रामनवमीची पूजा केली. त्यांचा पूजा करतानाचा व्हिडिओही समोर आला आहे.
‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’चं 31 मार्च रोजी उद्घाटन करण्यात येत आहे. भारतीय संस्कृती आणि कलेसाठी नवी दालनं खुली होतील असा विश्वास नीता अंबानी यांनी व्यक्त केला आहे. उद्घाटनानिमित्त संपूर्ण 3 दिवसांचा ब्लॉकबस्टर शो असेल. यासाठी खास तिकीटं देखील आयोजित करण्यात आली आहे.
SD Social Media
9850 60 3590