करोना संपला नाही, त्याचा वेगही
कमी झालेला नाही : सौम्या स्वामिनाथन
करोनानं संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतलं आहे. त्यामुळे प्रत्येक देश करोनाशी लढा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. अनेक देशांनी करोना लसीकरणावर जोर दिला आहे. त्यात अनेक देशांनी करोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिसताच नियम शिथिल केले आहेत. त्यामुळे करोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. करोना संपला नाही, त्याचा वेगही कमी झालेला नाही, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं आहे. यापुढे काळजी घेणं गरजेचं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री
वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात
राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातातून थोडक्यात बचावल्या असून, सुखरुप आहेत. वर्षा गायकवाड यांच्या गाडीला आज (१० जुलै) भरधाव टेम्पोनं पाठीमागून धडक दिली. वर्षा गायकवाड यांच्याकडे शिक्षणमंत्री पदाबरोबरच हिंगोलीच्या पालकमंत्री पदाचीही जबाबदारी आहे. हिंगोलीच्या दिशेनं जात असतानाच हा अपघात झाला., याबाबत वर्षा गायकवाड यांनी अद्याप माहिती दिलेली नाही.
आगामी सणासुदीच्या काळात
डाळींचे भाव भडकण्याची भीती
छोट्या व्यापाऱ्यांना १ जुलैपासून ५० क्विंटल आणि कारखानदारास एक हजार क्विंटल कडधान्ये साठवता येतील, असे निर्बंध घालणारा केंद्रीय कायदा लागू झाल्याने चार दिवसांपासून मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात व्यापाऱ्यांनी शेतमाल खरेदी बंद केली आहे. कडधान्ये साठवणुकीच्या मर्यादेमुळे कारखाने बंद पडण्याची, परिणामी आगामी सणासुदीच्या काळात डाळींचे भाव भडकण्याची भीती आहे.
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई,
२५०० कोटी किंमतीची हेरॉईन जप्त
दिल्ली पोलिसांनी एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. दिल्ली पोलिसांची ही मोठी कारवाई असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी २५०० कोटी किंमतीची ३५० किलो हेरॉईन जप्त केली आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांनी चार आरोपींनाही अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी तीन जणांना हरियाणा आणि एका आरोपीला दिल्लीहून अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींची चौकशी केली जात आहे.
आतापर्यंत तुम्ही काय
झोपा काढत होता का ?
आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज(शनिवार) स्वप्निल लोणकरच्या कुटुंबीयांची भेट घेऊन, त्यांचे सांत्वन केले. यानंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. एमपीएससीबाबत राज्य सरकारचे धोरण सुस्पष्ट नाही. आता बैठका घेत आहात, म्हणजे तुमचं अजून धोरणच ठरलेलं नाही. मग आतापर्यंत तुम्ही काय झोपा काढत होता का? असा संतप्त सवाल देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला यावेळी केला.
पर्यटनासाठी गेलेले
तिघे जण बुडाले
कुर्ला येथून हे तिघे पाली भूतवली धरणावर पोहण्यासाठी आले होते, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाले. मृतांमध्ये साहील हिरालाल त्रिभुके (वय- १५ वर्षे), प्रीतम गौतम साहू ( वय -१२ वर्षे), मोहन साहू (वय -१६ वर्षे) या तिघांचा समावेश असून, हे तिघेही कुर्ला नौपाडा, नानीबाई चाळ येथील आहेत.
रशियात कुत्र्यांना युद्धासाठी
खास पॅराशूट प्रशिक्षण
रशियात कुत्र्यांना युद्धासाठी खास पॅराशूट प्रशिक्षण देण्यात आलं. या प्रशिक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हेलिकॉप्टर किंवा विमान उतरणं ज्या ठिकाणी कठीण आहे, अशा ठिकाणी कुत्र्यांना पॅराशूटमधून खाली उतरवण्यासाठी हे प्रशिक्षण देण्यात आलं. वरुन खाली येताना कुत्रा कसा वागतो? याबाबतही तपासणी करण्यात आली.
संजय राऊतांना सहकारमधलं
कळतं का : चंद्रकांत पाटील
सहकार खात्याचा कारभार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे गेल्याची सुरू आहे. अमित शाह यांच्याकडे सहकार खातं देऊन महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार कारखान्यांना शह देण्याची मोदींची योजना असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील सहकार खात्यावरून केंद्र सरकारवर टीका केली असताना त्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. संजय राऊतांना सहकारमधलं का कळतं? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
सातारा जिल्हा बँकेला
नोटीस बजावली
जरंडेश्वर साखर कारखान्याला केलेल्या कर्जपुरवठ्याची माहिती अंमलबजावणी संचालनालयाने सातारा जिल्हा बँकेला मागितली आहे. या बाबतची नोटीस नुकतीच बँकेला बजावण्यात आली. यामुळे सहकार बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली. या कारखान्याला केलेला कर्जपुरवठा रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या धोरणानुसारच केलेला असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी सांगितले आहे.
दारू बंदी उठवली, बार मालकाने
वडेट्टीवार यांची आरती केली
चंद्रपूर जिल्ह्यातील दारू बंदी उठविण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची राहिली आहे. त्यामुळे एका बार मालकाने राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे छायाचित्र बियर बार मध्ये लावून त्यांची आरती केली. वडेट्टीवार यांच्या आरतीचा हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल होत आहे.
SD social media
9850 60 3590