‘देश का पंतप्रधान शरद पवार जैसा…’, भाषणावेळीच घोषणा

महाविकासआघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आज मुंबईमध्ये पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये महाविकासआघाडीच्या नेत्यांच्या सभा घ्यायची रणनिती ठरवण्यात आली आहे. या सभांमधून केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचं महाविकासआघाडीच्या नेत्यांनी ठरवलं आहे. या बैठकीनंतर वाय.बी.चव्हाण सेंटरमध्ये तीनही पक्षांच्या नेत्यांनी भाषणं केली. उद्धव ठाकरे भाषणाला उभे राहिले तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

पंतप्रधानपदासाठी ठाकरे गट विशेषतः संजय राऊतांकडून उद्धव ठाकरे यांचं नाव चर्चेत आणलं जातं. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंतप्रधानपदासाठी शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु असते. उद्धव ठाकरे यांच्या भाषणावेळी एका उत्साही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने देश का पंतप्रधान कैसा हो, शरद पवार जैसा हो अशी घोषणा दिली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनीही काहीही हरकत नसल्याचं म्हणत महाविकासआघाडीच्या नेत्यांना एक सल्ला दिला.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

ही घोषणा ऐकून उद्धव ठाकरे हसले, तसंच ‘काही हरकत नाही, पण त्याच्यासाठी पहिले एकत्रित लढा. नाहीतर परत तेच, तुझं माझं तुझं माझं. तंगड्यात तंगड्या घालायला लागलो, तर आपण इकडेच राहू आणि घोषणा देणारेही इकडेच राहतील. पंतप्रधानपद ही खूप मोठी स्वप्न आहेत. पहिले गाव पातळीवर तुम्ही एकत्र होऊन दाखवा, हे एकत्र झालं तर पुढचं कामच सोपं झालं,’ असा सल्ला उद्धव ठाकरेंनी तीनही पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.